Four Terrorists Entered India: चार दहशतवादी भारतात; देशभरात हाय अलर्ट

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 20, 2019 | 13:28 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Four Terrorists Entered India: राजस्थानमधील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने चार दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा एक एजंट आणि ४ दहशतवादी सध्या भारतात वास्तव्यास आहेत.

Terrorist
भारतात घुसले चार दहशतवादी   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांची माहिती, देशभरात हाय अलर्ट
  • चार दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती; अफगाणिस्तानच्या पासपोर्टवर शिरले भारतात
  • गुजरात, राजस्थानमध्ये अफगाणी नागरिकांची तपासणी आणि चौकशी

Four Terrorists Entered India: भारताने काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानला पोटशूळ उठला आहे. त्यामुळे भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याची तयारी पाकिस्तानने केल्याची चर्चा आहे. त्या चर्जेला आता बळ मिळू लागले आहे. राजस्थानमधील एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने चार दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा एक एजंट आणि त्याच्यासोबत चार दहशतवादी अफगाणिस्तानच्या पासपोर्टने भारतात घुसल्याची माहिती आहे. हे दहशतवादी केव्हाही कोठेही हल्ला करू शकतील, असे राजस्थानमधील सिरोहीचे पोलिस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी सांगितले आहे. सरकारने गेल्या काही दिवसांपासून दहशतावादी हल्ल्यांची शक्यता असल्याच्या कारणावरून सुरक्षा दलांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. दहशतवादी घुसल्याच्या वृत्तानंतर राजस्थानमध्ये सर्व जिल्ह्यांच्या पोलिस ठाण्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. राजस्थानात प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असून, संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. गुजरात पोलिसांच्या गुप्तचर खात्याकडून गुजरात तसेच उदयपूर, सिरोही येथे दहशतवाद्यांच्या हलाचाली होत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारावर गुजरात गुप्तचर विभागाने उदयपूर आणि सिरोहीमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.

 

 

सीमेवर सुरक्षा वाढविली

गुप्तचर विभागाने ९ ऑगस्ट रोजी दिलेल्या गुप्तचर अहवालातून दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वर्तवली होती. या अहवालानुसार पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे एजंट आणि दहशतवादी संघटनांचे काही तरुण काश्मीरच्या बाहेर जम्मू-काश्मीर मोठा दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने १५ जुलैपासूनच राज्यात वास्तव्यास असलेल्या सर्व अफगाणी नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यात अफगाणी पासपोर्ट असलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. तो कधीपासून राहण्यास आला आहे. तो भारतात काय करतो, शिक्षण घेत असले तर कधीपर्यंत घेणार आहे, याची माहिती घेण्यात आली आहे. सध्या गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने विदेशी नागरिकांच्या येण्या-जाण्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच १७ ऑगस्टला सर्व पोलिस ठाण्यांना एका संशयिताचे स्केच फॅक्स करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती संशयित व्यक्ती दहशतवाद्यांचा प्रमुख आहे. त्याने स्वातंत्र्यदिनाच्या आधीच भारतात प्रवेश केला आहे.

म्होरक्या अफगाणिस्तानचा

या फॅक्ससोबत देण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनुसार भारतातील प्रमुख शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच चार पाकिस्तानी दहशतवादी अफगाणिस्तानच्या पासपोर्टवर भारतात शिरले आहेत. या स्केचमध्ये देण्यात आलेला चेहरा हा त्या दहशतवादी टोळीचा म्होरक्या आहे. तो अफगाणिस्तानातील कुनार प्रांताचा रहिवासी असल्याचीही माहिती आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Four Terrorists Entered India: चार दहशतवादी भारतात; देशभरात हाय अलर्ट Description: Four Terrorists Entered India: राजस्थानमधील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने चार दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयचा एक एजंट आणि ४ दहशतवादी सध्या भारतात वास्तव्यास आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी