चीनच्या सायबर हेरांच्या निशाण्यावर भारत, संरक्षण, टेलिकॉमसह इतर क्षेत्रे करत आहे टार्गेट

भारतावर कुरघोडी करण्याच्या सतत प्रयत्नात असणाऱ्या चीनच्या कावेबाजपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. चीनच्या सायबर सैनिकांच्या एका संशयास्पद दलाने भारतातील अनेक क्षेत्रांना लक्ष्य केल्याची माहिती मिळत आहे.

Chinese President
चीनच्या सायबर हेरांच्या निशाण्यावर भारत, संरक्षण, टेलिकॉमसह इतर क्षेत्रे करत आहे टार्गेट 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांशी संबंधित संस्थेने प्रसिद्ध केला निष्कर्ष
  • 2020 आणि 2021दरम्यान अनेक भारतीय संस्था टार्गेटवर
  • दोन पातळ्यांवर देश करतात सायबर ऑपरेशन्स

भारतावर (India) कुरघोडी करण्याच्या सतत प्रयत्नात असणाऱ्या चीनच्या (China) कावेबाजपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. चीनच्या सायबर सैनिकांच्या (cyber soldiers) एका संशयास्पद दलाने (suspicious team) भारतातील अनेक क्षेत्रांना (sectors) लक्ष्य (targeted) केल्याची माहिती मिळत आहे. यात दूरसंचार (telecom), सरकारी यंत्रणा (government agencies), अनेक सुरक्षा कंत्राटदारांचाही (security contractors) समावेश आहे. एका सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनीने (cyber threat intelligence company) याची माहिती दिली आहे. कंपनीने खुलासा करत सांगितले आहे की चीनच्या या कारवायांचे पुरावेही (proofs) आहेत आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (People’s Liberation Army) एका संस्थेशी ही मोहीम जोडलेली आहे.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांशी संबंधित संस्थेने प्रसिद्ध केला निष्कर्ष

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मुख्यालयाच्या आखत्यारीत येणाऱ्या रेकॉर्डेड फ्यूचरकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता ज्यात या वर्षाच्या सुरुवातीला वीज आणि बंदराच्या क्षेत्रांमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण पायाभूत ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या चीनच्या प्रयत्नांबद्दल सूचना देण्यात आली होती. मार्चमध्ये समोर आलेल्या या पथकाला रेडइको म्हटले गेले तर आत्ता समोर आलेल्या नव्या समूहाची ओळख रेडफॉक्सट्रोट अशी पटवण्यात आली आहे.

2020 आणि 2021दरम्यान अनेक भारतीय संस्था टार्गेटवर

रेकॉर्डेड फ्यूचरच्या इंसिक्ट ग्रुपने चीनच्या सरकारने प्रायोजित केलेल्या या समूहाची ओळख पटवली आहे ज्याला रेडफॉक्सट्रोट म्हणून ट्रॅक केले जात आहे. त्यांनी 2020 आणि 2021मध्ये अनेक भारतीय संघटनांना लक्ष्य केले आहे. खासकरून गेल्या 6 महिन्यांमध्ये दोन दूरसंचार संघटना, तीन सुरक्षा कंत्राटदार आणि अनेक अतिरिक्त सरकारी आणि खासगी क्षेत्रातील संस्थाना त्यांनी सफलतापूर्वक लक्ष्य केले आहे. अद्याप भारताच्या सायबर सुरक्षा संस्थेकडून या अहवालावर कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. इंसिक्टच्या माहितीनुसार जेव्हा चीन आणि भारतादरम्यान तणाव होता त्या काळात या हालचाली अधिक वेगाने झाल्या आहेत.

दोन पातळ्यांवर देश करतात सायबर ऑपरेशन्स

सामान्यतः एक देश दुसऱ्या देशावर दोन पातळ्यांवर सायबर ऑपरेशन्स करतो. एक असते ती तोडफोडीची आणि दुसरी हेरगिरीची. आजकाल ही बाब फारच सामान्य झाली आहे, मात्र या दोन्ही पातळ्यांवरच्या ऑपरेशन्सचा माग काढणे तितकेच अवघड असते. याच महिन्यात भारतीय कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने म्हटले होते की त्यांना चीनशी संबंधित सायबर अॅक्टर्सकडून भारताच्या परिवहन क्षेत्राविरोधात हेरगिरीचे अभियान चालवले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. चीन आणि चीनशी संबंधित सायबर ऑपरेशन्स ही भारतासाठी घातक म्हणूनच पाहिली जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी