भारतात १०,३०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

India reports 10302 new covid19 cases भारतात मागील २४ तासांत १० हजार ३०२ नव्या कोरोना रुग्णांची आणि २६७ मृत्यूची नोंद झाली. याच काळात देशातील कोरोना रुग्णांपैकी ११ हजार ७८७ जण बरे झाले. देशात १ लाख २४ हजार ८६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

India reports 10302 new covid19 cases
भारतात १०,३०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद 
थोडं पण कामाचं
  • भारतात १०,३०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • ५३१ दिवसांतील सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या
  • भारतातील ३ कोटी ४४ लाख ९९ हजार ९२५ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३९ लाख ९ हजार ७०८ जण बरे झाले

India reports 10302 new covid19 cases नवी दिल्ली: भारतात मागील २४ तासांत १० हजार ३०२ नव्या कोरोना रुग्णांची आणि २६७ मृत्यूची नोंद झाली. याच काळात देशातील कोरोना रुग्णांपैकी ११ हजार ७८७ जण बरे झाले. देशात १ लाख २४ हजार ८६८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही ५३१ दिवसांतील सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. 

मागील २४ तासांत भारतात आढळलेल्या १० हजार ३०२ नव्या कोरोना रुग्णांपैकी ५ हजार ७५४ जण केरळमधील आहेत. तसेच देशात २४ तासांत झालेल्या २६७ कोरोना मृत्यू पैकी ४९ केरळमधील आहेत.

भारतात आतापर्यंत आढळलेल्या ३ कोटी ४४ लाख ९९ हजार ९२५ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३९ लाख ९ हजार ७०८ जण बरे झाले. कोरोनामुळे देशात ४ लाख ६५ हजार ३४९ मृत्यू झाले.

को-विन डॅशबोर्डनुसार भारतात १ अब्ज १५ कोटी ८४ लाख ३३ हजार ६११ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ७६ कोटी ३८ लाख ३४ हजार ७७२ जणांना लसचा पहिला डोस तर ३९ कोटी ४५ लाख ९८ हजार ८३९ जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये १४ कोटी ६७ लाख ७८ हजार ११० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. महाराष्ट्रात १० कोटी ५९ लाख ८३ हजार ७८३ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले.

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 6 7541   129  
2 Andhra Pradesh 2425 135  2054056 301  14425
3 Arunachal Pradesh 48 54915 280  
4 Assam 3054 88  605933 277  6066
5 Bihar 39   716480 9663  
6 Chandigarh 27 64551 820  
7 Chhattisgarh 290 18  992613 17  13591  
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 0   10678   4  
9 Delhi 325 37  1415185 67  25095  
10 Goa 248 174989 24  3377  
11 Gujarat 331 19  816726 16  10091
12 Haryana 135 761330 23  10052  
13 Himachal Pradesh 1051 93  221385 142  3828
14 Jammu and Kashmir 1669 88  328888 105  4459  
15 Jharkhand 133 343839 27  5139  
16 Karnataka 7287 91  2947683 329  38169
17 Kerala*** 61981 939  4990817 6489  37051 204 
18 Ladakh 224 13  20862 15  212  
19 Lakshadweep 5   10314   51  
20 Madhya Pradesh 78   782396 10525  
21 Maharashtra 15356 27  6472681 918  140707 15 
22 Manipur 588 122210 50  1959
23 Meghalaya 286 15  82435 23  1467  
24 Mizoram 5022 247  125751 581  475
25 Nagaland 127 31218 12  695  
26 Odisha 2203 115  1035967 354  8389
27 Puducherry 314 12  126405 37  1869
28 Punjab 315 586048 27  16580
29 Rajasthan 101 945521 8955
30 Sikkim 114 31630 403
31 Tamil Nadu 8953 125  2673448 884  36349 13 
32 Telangana 3657 37  666682 173  3979
33 Tripura 83 83807 14  818  
34 Uttarakhand 184 336496 7404  
35 Uttar Pradesh 102 1687306 10  22909  
36 West Bengal 8107 35  1580922 833  19364
Total# 124868 1752  33909708 11787  465349 267 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी