India Covid19 Stats भारतात आढळले कोरोनाचे १४,३१३ नवे रुग्ण

भारतात मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या १४ हजार ३१३ नव्या रुग्णांची आणि ५४९ मृत्यूची नोंद झाली. मागील २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांपैकी १३ हजार ५४३ जण बरे झाले.

India reports 14,313 new Covid-19 cases in last 24 hours
India Covid19 Stats भारतात आढळले कोरोनाचे १४,३१३ नवे रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • India Covid19 Stats भारतात आढळले कोरोनाचे १४,३१३ नवे रुग्ण
  • भारतात मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या १४ हजार ३१३ नव्या रुग्णांची आणि ५४९ मृत्यूची नोंद
  • मागील २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांपैकी १३ हजार ५४३ जण बरे झाले

India reports 14,313 new Covid-19 cases in last 24 hours । नवी दिल्ली: भारतात मागील २४ तासांमध्ये कोरोनाच्या १४ हजार ३१३ नव्या रुग्णांची आणि ५४९ मृत्यूची नोंद झाली. तसेच मागील २४ तासांत देशातील कोरोना रुग्णांपैकी १३ हजार ५४३ जण बरे झाले. 

आतापर्यंत भारतात आढळलेल्या ३ कोटी ४२ लाख ६० हजार ४७० कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ३६ लाख ४१ हजार १७५ जण बरे झाले. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ४ लाख ५७ हजार ७७३ मृत्यू झाले. भारतात सध्या १ लाख ६१ हजार ५२२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भारतात १०५ कोटींपेक्षा जास्त लसीकरण

भारतात आतापर्यंत १ अब्ज ५ कोटी ६१ लाख ८७ हजार ९५० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ७३ कोटी ९ लाख ९१ हजार ६१८ जणांना लसचा पहिला डोस तर ३२ कोटी ५१ लाख ९६ हजार ३३२ जणांना लसचा दुसरा डोस देण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी