नववर्षात बाप्पा पावला! देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट, ९९ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

India Covid-19 report: भारतामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

corona_update
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

Covid-19 updates: नववर्षाच्या पहिल्याच (New year 2021) दिवशी कोरोना लसीच्या (Covid-19 vaccine) संदर्भात भारताला एक चांगली बातमी मिळाली. तर आज दुसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या २४ तासांत भारतात १९,०७८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून २२,९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. भारतातील रिकव्हरी रेट (Recovery rate) ९६.१२% इतका झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ कोटी ३ लाख झाली आहे. यापैकी एकूण ९९ लाख ६ हजार ४८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्य स्थितीत भारतात २ लाख ५० हजार १८३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत १ लाख ४९ हजार २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१७ कोटींहून अधिक कोविड टेस्ट 

आयसीएमआरच्या मते, एक जानेवारीपर्यंत देशभरात एकूण १७ कोटी ३९ लाख चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ८.२९ लाख चाचण्या काल करण्यात आल्या आहेत. भारतात पॉझिटिव्हीटी रेट सात टक्क्यांवर आहे. देशातील ३३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अॅक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या ही २०,००० हून कमी आहे. कोरोना बाधितांच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ४० टक्के हे केरळ आणि महाराष्ट्रात आहेत.

सक्रीय रुग्णांची संख्येत मोठी घट 

आजच्या तारखेला भारतातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २,५०,१८३ इतकी आहे. ही संख्या ३० जुलै २०२० रोजीच्या आकडेवारीपेक्षा कमी झाली आहे. ३० जुलै २०२० रोजी भारतात एकूण ५,२८,२४२ अॅक्टिव्ह रुग्ण होते तर रिकव्हरी रेट ६४.४४ टक्के इतका होता. सध्यस्थितीत भारतातील रिकव्हरी रेट हा ९६.१२ टक्के इतका झाला आहे.

ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीला भारतात मान्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन उपयोगासाठी सीडीएससीओ (CDSCO) म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने मान्यता दिली आहे. मात्र, अंतिम परवानगी ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय घेणार आहे. कोविशिल्ड लसीची निर्मिती भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. डीसीजीआयने परवानगी देताच भारतात लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

S. No. Name of State / UT Active Cases* Cured/Discharged/Migrated* Deaths**
Total Change since yesterday Cumulative Change since yesterday Cumulative Change since yesterday
1 Andaman and Nicobar Islands 54 4830 62  
2 Andhra Pradesh 3238 24  872266 350  7108  
3 Arunachal Pradesh 97 16566 56  
4 Assam 3210 46  211992 82  1049
5 Bihar 4945 75  245874 398  1400
6 Chandigarh 372 14  19109 64  318
7 Chhattisgarh 11344 91  265788 1019  3375
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 11   3365   2  
9 Delhi 5358 153  610039 717  10557 21 
10 Goa 930 49466 78  739  
11 Gujarat 9663 176  231800 907  4309
12 Haryana 3314 253  256386 533  2911
13 Himachal Pradesh 2394 221  52140 412  936
14 Jammu and Kashmir 3016 116327 248  1884
15 Jharkhand 1682 23  112529 105  1030  
16 Karnataka 11077 213  897200 1084  12096
17 Kerala 65238 143  697591 5111  3095 23 
18 Ladakh 245 50  9153 127  
19 Madhya Pradesh 9222 132  229731 900  3618 12 
20 Maharashtra 53231 814  1832825 4279  49580 59 
21 Manipur 1108 47  26742 64  356
22 Meghalaya 164 15  13142 139  
23 Mizoram 111 4100 8  
24 Nagaland 191 11  11659 13  79  
25 Odisha 2257 59  325733 301  1876
26 Puducherry 366 18  37165 50  633  
27 Punjab 3517 168  157904 408  5349
28 Rajasthan 9223 337  296929 942  2700
29 Sikkim 534 5238 128
30 Tamil Nadu 8380 121  798420 1029  12135 13 
31 Telengana 5571 244  279991 535  1546
32 Tripura 96 32795 16  385  
33 Uttarakhand 4577 142  85189 497  1515
34 Uttar Pradesh 13831 429  564541 1263  8379 15 
35 West Bengal 11616 369  531862 1496  9738 26 
Total# 250183 4071  9906387 22926  149218 224 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी