Zydus Cadila भारत झायडस कॅडिलाची लस खरेदी करणार

India set to buy Zydus Cadila's coronavirus vaccine भारत सरकार झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसचे एक कोटी डोस खरेदी करणार आहे. झायडस कॅडिला कंपनीची लस डीएनएद्वारे विकसित करण्यात आली आहे. डीएनएद्वारे विकसित केलेली ही जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे.

India set to buy Zydus Cadila's coronavirus vaccine
भारत झायडस कॅडिलाची लस खरेदी करणार 
थोडं पण कामाचं
  • भारत झायडस कॅडिलाची लस खरेदी करणार
  • लसचे एक कोटी डोस खरेदी करणार
  • झायडस कॅडिला कंपनीची लस डीएनएद्वारे विकसित केलेली जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे

India set to buy Zydus Cadila's coronavirus vaccine । नवी दिल्ली: भारत सरकार झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसचे एक कोटी डोस खरेदी करणार आहे. झायडस कॅडिला कंपनीची लस डीएनएद्वारे विकसित करण्यात आली आहे. डीएनएद्वारे विकसित केलेली ही जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे. केंद्र सरकार ३.५७ डॉलरला एक डोस या दराने लसचे एक कोटी डोस खरेदी करणार आहे.

झायडस कॅडिला कंपनीच्या लसचे तीन डोस घेतल्यानंतर कोरोनापासून पुरेसे संरक्षण मिळू शकते. ही लस बारा किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना देण्यासाठी 'ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने (Drug Controller General of India - DCGI) आपत्कालीन मंजुरी दिली आहे. ही लस फार्माजेट अॅप्लीकेटरच्या मदतीने त्वचेतून थेट शरीरात सोडली जाईल.

प्रत्येक व्यक्तीला लसचा एक डोस आणि त्यासाठी एक स्वतंत्र अॅप्लीकेटर यांचा वापर होईल. यामुळे प्रत्येकाचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी (तीन डोस) १४.४८ डॉलरचा खर्च करावा होईल. भारतात आतापर्यंत १ अब्ज ९ कोटी ६ लाख ३९ हजार ९०९ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ७४ कोटी ३५ लाख ३६ हजार ६७५ जणांना पहिला डोस तर ३४ कोटी ७१ लाख ३ हजार २३४ जणांना दुसरा डोस टोचण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणात सुमारे ८८ टक्के डोस हे पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया'च्या कोविशिल्ड लसचे आहेत. बाकीचे डोस हे हैदराबादच्या 'भारत बायोटेक' कंपनीच्या कोवॅक्सिन लसचे आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी