Agni-5 missile अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पल्ला पाच हजार किमी

भारताने आज (बुधवार २७ ऑक्टोबर २०२१) ५ हजार किमी पल्ला असलेल्या अग्नी ५ या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची पहिल्यांदा रात्रीच्या वेळी यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमुळे चीनची अनेक शहरे भारतीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली.

India successfully test-fires Agni-5 missile having range of 5000 km
Agni-5 missile अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पल्ला पाच हजार किमी 
थोडं पण कामाचं
  • Agni-5 missile अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, पल्ला पाच हजार किमी
  • पहिल्यांदा रात्रीच्या वेळी यशस्वी चाचणी
  • चीनची अनेक शहरे भारतीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात

नवी दिल्ली: भारताने आज (बुधवार २७ ऑक्टोबर २०२१) ५ हजार किमी पल्ला असलेल्या अग्नी ५ या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची पहिल्यांदा रात्रीच्या वेळी यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमुळे चीनची अनेक शहरे भारतीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली. हे क्षेपणास्त्र मोबाइल लाँचरवरुन डागता येते. यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून कोणत्याही वेळी शत्रूवर हल्ला करणे शक्य आहे. हे क्षेपणास्त्र आधी आकाशात विशिष्ट उंची गाठते नंतर गुरुत्वाकर्षणाचा सुयोग्य वापर करुन ताशी २९ हजार ४०० किमी. अर्थात २४ मॅक या प्रचंड वेगाने लक्ष्याकडे झेपावते. India successfully test-fires Agni-5 missile having range of 5000 km

अग्नी ५ हे एक आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

अग्नी ५ हे जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणारे एक आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या आधी सात यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. भारताने रात्रीच्या वेळी केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीत एमआयआरव्ही (Multiple Independently Targetable Reentry Vehicle - MIRV) तंत्रज्ञानाचा वापर केला होता की नाही हे अद्याप समजलेले नाही. या तंत्राच्या मदतीने एकाच क्षेपणास्त्राद्वारे किमान दोन आणि कमाल दहा ठिकाणी स्फोटके टाकून हल्ला करणे शक्य आहे. जर हे तंत्र पण वापरले असेल तर कोणत्याही वेळी हल्ला करुन शत्रूची मोठी हानी करण्याची क्षमता भारताच्या हाती आली असे म्हणणे योग्य ठरेल.

भारताच्या भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या एकत्रिकरणातून एक 'स्ट्रॅटेजिक फोर्स' तयार करण्यात आला आहे. या 'स्ट्रॅटेजिक फोर्स'कडे भारताच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा विभाग सोपवण्यात आला आहे. 

५० टन वजनाचे क्षेपणास्त्र

लष्कराच्या विशिष्ट ट्रकमधून एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेता येणारे अग्नी ५ हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर व्यास असलेले ५० टन वजनाचे क्षेपणास्त्र आहे. भारत सरकारने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार अग्नी ५ क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किमी एवढा आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते या क्षेपणास्त्राचा पल्ला आठ हजार किमी एवढा आहे. हे तीन टप्पात कार्यरत होणारे क्षेपणास्त्र आहे. 

बुधवारी चाचणीसाठी दीड टन स्फोटकांसह क्षेपणास्त्र डागण्यात आले.ओडिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या कलाम बेटावरुन संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी क्षेपणास्त्र डागण्यात आले. नियोजनानुसार क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी झाली. चाचणी दरम्यान उपग्रह आणि समुद्रात कार्यरत असलेल्या नौदलाच्या यंत्रणांनी प्रत्येक क्षणी क्षेपणास्त्र आपले नियोजीत कार्य पार पाडत आहे की नाही याचा वेध घेतला. 

भारताकडे सुखोई ३० एमकेआय, मिराज २०००, जॅग्वार, राफेल ही विमानं आहेत. या विमानांमधून निवडक अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र डागणे शक्य आहे. यामुळे भारताच्या आण्विक हल्ला करण्याच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी