भारताच्या स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

India successfully tests indigenous Stand-Off Anti-Tank Missile from Pokhran भारताच्या स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज (शनिवार ११ डिसेंबर २०२१) घेण्यात आली. डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

Stand-Off Anti-Tank Missile
भारताच्या स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 
थोडं पण कामाचं
  • भारताच्या स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
  • पल्ला दहा किमी
  • शत्रूपासून सुरक्षित अंतर राखून हल्ला करणे सोपे आणि आणखी प्रभावी होणार

India successfully tests indigenous Stand-Off Anti-Tank Missile from Pokhran नवी दिल्ली: भारताच्या स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज (शनिवार ११ डिसेंबर २०२१) घेण्यात आली. डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हेलिकॉप्टरमधून निश्चित केलेल्या लक्ष्याच्या दिशेने हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते. या क्षेपणास्त्राद्वारे १० किमी. लांब पर्यंतच्या लक्ष्याचा भेद करणे शक्य आहे. स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रामुळे शत्रूपासून सुरक्षित अंतर राखून हल्ला करणे सोपे आणि आणखी प्रभावी होणार आहे.

डीआरडीओने स्वदेशी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी राजस्थानमध्ये पोखरण रेंज येथे घेतली. याआधी पोखरणमध्ये पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरच्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी झाली. 

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती या दोन्हीच्या चाचण्या यशस्वी झाल्या. लक्ष्य निश्चित करणे, प्रक्षेपण, लक्ष्यावर निश्चित केलेल्या वेळेत हल्ला करुन लक्ष्यभेद करणे यासह इतर तांत्रिक बाबींवर सतत लक्ष ठेवण्यात आले. सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले. 

काही दिवसांपूर्वी लांब पल्ल्याचे बॉम्ब आणि स्मार्ट अँटी एअरफिल्ड गन यांची यशस्वी चाचणी झाली. पाठोपाठ पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यांच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी