हिंदी-चिनी भाई-भाईंना एकमेंकांच्या देशात नो एंट्री; चिनी नागरिकांचा टुरिस्ट व्हिसा भारताकडून निलंबित

जागतिक एअरलाइन्स बॉडीने (IATA) म्हटलं की, भारताने चिनी नागरिकांना दिलेला टुरिस्ट व्हिसा (Tourist visa) आता वैध नसरणार आहे. उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरम्यान भारत (India) अद्याप चिनी नागरिकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा देत आहे. भारताचा निर्णय म्हणजे जशास तसे या पद्धतीप्रमाणे घेतल्याचं दिसत आहे.

India suspended Tourist visa of Chinese citizens
चिनी नागरिकांचा टुरिस्ट व्हिसा भारताकडून निलंबित   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • 27 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यावर भारताने 156 देशांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्यटक व्हिसा सुविधा पुनर्संचयित केली.
  • चिनी नागरिकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा मिळतोय.

नवी दिल्ली : जागतिक एअरलाइन्स बॉडीने (IATA) म्हटलं की, भारताने चिनी नागरिकांना दिलेला टुरिस्ट व्हिसा (Tourist visa) आता वैध नसरणार आहे. उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरम्यान भारत (India) अद्याप चिनी नागरिकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा देत आहे. भारताचा निर्णय म्हणजे जशास तसे या पद्धतीप्रमाणे घेतल्याचं दिसत आहे.

कारण चिनी पर्यटकांचा व्हिसा निलंबित करण्याचा हा निर्णय तेव्हाच आला जेव्हा चीनने 20,000 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना परत येऊ देण्यास तयार नाहीये.  हे विद्यार्थी कोरोनाच्या काळात भारतात परतले होते, आता परत आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये जाण्याची परवानगी मागत आहेत. परंतु त्यांना प्रतिक्षा यादीत टाकलं आहे. त्याच वेळी, थायलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना परत येण्याची परवानगी देऊनही, त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवलं आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या भेटीतील समकक्ष वांग यी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु बीजिंगने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. विशेष म्हणजे, यूके आणि कॅनडा हे देश आहेत ज्यांचे नागरिक ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊ शकत नाहीत, परंतु या देशांतील नागरिकांना भारतीय मिशन्सद्वारे जारी केलेल्या नियमित कागदी व्हिसावर भारतात येण्याची परवानगी आहे. दुसरीकडे, जपान आणि यूएसच्या नागरिकांना जारी केलेले व्हिसा वगळता 10 वर्षांची वैधता असलेले भारतीय पर्यटक व्हिसा आता वैध नाहीत. 

IATA ने अपडेट

IATA ही अपडेट नियमितपणे जारी करते, जेणेकरून एअरलाइन्सना माहित असेल की कोणत्या देशांना उड्डाण करण्याची परवानगी आहे. 19 एप्रिल रोजी जारी केलेले नवीनतम IATA अपडेट त्या देशांबद्दल आहे, ज्यांचे नागरिक ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात प्रवास करू शकत नाहीत. दोन वर्षांनंतर, 27 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यावर भारताने 156 देशांसाठी इलेक्ट्रॉनिक पर्यटक व्हिसा सुविधा पुनर्संचयित केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी