13 डिसेंबरला भारताने उधळले पाकचे नापाक इरादे, दहशतवाद्यांचा संसदेत घुसण्याचा डाव हाणून पाडताना जवान शहीद

2001 Parliament Attack : 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे. त्याच्या शौर्य आणि पराक्रमामुळे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर संसदेच्या आवारात घुसलेल्या दहशतवाद्यांना त्यांचे मनसुबे यशस्वी करता आले नाहीत.

India thwarts Pakistan's nefarious intentions on December 13, Soldier martyred while thwarting terrorists' plot to enter Parliament
13 डिसेंबरला भारताने उधळले पाकचे नापाक इरादे, दहशतवाद्यांचा संसदेत घुसण्याचा डाव हाणून पाडताना जवान शहीद   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा हल्ला
  • सुरक्षा रक्षकांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानला मनसुबे यशस्वी करता आले नाहीत.
  • या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देश श्रद्धांजली अर्पण करत आहे

2001 Parliament Attack मुंबई : एकविसाव्या शतकाला एक वर्ष पूर्ण होणार होते. वर्ष 2001 होते आणि 13 डिसेंबरच्या दिवशी अचानक भारताच्या लोकशाहीच्या (democracy) मंदिरात गोळ्यांचा आवाज येऊ लागला. पाकिस्तानात (pakistan) बसलेल्या दहशतवाद्यांच्या (terrorist) सूत्रधारांनी भारतीय लोकशाही अस्थिर करण्याचा नापाक प्रयत्न केला होता. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी संसद (parliment) परिसरात घुसले. पण संसदेत घुसण्याचा त्यांचा डाव देशाच्या शूर जवानांनी (solidier) हाणून पाडला. (India thwarts Pakistan's nefarious intentions on December 13, Soldier martyred while thwarting terrorists' plot to enter Parliament)

पाच दहशतवाद्यांचा खात्मा

बनावट आयडीवरून बंदूकधारी दहशतवादी संसदेच्या आवारात घुसले होते. तेव्हा संसद भवनात 100 खासदार उपस्थित होते, मात्र शूर जवानांच्या संरक्षण रेषेमुळे त्यांना ओरखडाही आला नाही. एकूण पाच दहशतवादी ठार झाले असून 6 सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. नंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरूला २०१३ मध्ये फाशी देण्यात आली. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

मान्यवरांकडून शहीद जवानांना श्रध्दांजली

आजच्या दिवशी हा हल्ला झाला. अशा परिस्थितीत संपूर्ण देश शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतो आहे. राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी, यांच्यासह देशातील प्रमुख नेत्यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.

बलिदानाबद्दल राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी ः राष्ट्रपती

राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट केले की, 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संसदेचे 2001 मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सुरक्षा जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहील.

मोदींनी लिहिले, त्यांचे बलिदान प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देते

मोदींनी ट्विट केले की, '2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व सुरक्षा जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची राष्ट्रसेवा आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी