संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, 'या' मुद्यांवरून संघर्ष होणार?

india winter session of parliament to begin from today : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (बुधवार 7 डिसेंबर 2022) सुरू होत आहे. केंद्र सरकार अधिवेशनात 17 नव्या विधेयकांसह एकूण 19 विधेयके मंजूर करून घेण्याची तयारी करत आहे.

india winter session of parliament to begin from today
संसदेत 'या' मुद्यांवरून संघर्ष होणार?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, 'या' मुद्यांवरून संघर्ष होणार?
 • हिमाचल प्रदेश एक्झिट पोल - कोणत्या पक्षाला किती जागा?
 • गुजरात एक्झिट पोल - कोणत्या पक्षाला किती जागा?

india winter session of parliament to begin from today : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (बुधवार 7 डिसेंबर 2022) सुरू होत आहे. केंद्र सरकार अधिवेशनात 17 नव्या विधेयकांसह एकूण 19 विधेयके मंजूर करून घेण्याची तयारी करत आहे. तर विरोधक या अधिवेशनात महागाई, भारत-चीन सीमावाद, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, जुनी पेंशन योजना, बेरोजगारी या मुद्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

दिल्ली मनपाच्या (Municipal Corporation of Delhi - MCD) निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीसाठी रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी 50.48 टक्के मतदान झाले. यंदा सत्ताधारी भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये संघर्ष दिसत आहे. मुख्य संघर्ष भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात दिसत आहे. एक्झिट पोलनुसार यंदा दिल्ली मनपात आम आदमी पार्टीची सत्ता येईल आणि भाजप मुख्य विरोधी पक्ष होईल. यानंतर उद्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा तसेच ठिकठिकाणी झालेल्या निवडक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दोन्ही दिवसांवर निवडणूक निकालांचा प्रभाव राहील असा अंदाज व्यक्त होत आहे.

यंदाचे अधिवेशन बुधवार 7 डिसेंबर 2022 पासून गुरुवार 29 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. या 23 दिवसांच्या काळात सुटीचे दिवस वगळून 17 दिवस अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे.

हिमाचल प्रदेश एक्झिट पोल - कोणत्या पक्षाला किती जागा?

 1. भाजप - 34 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज
 2. काँग्रेस - 24 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज
 3. आम आदमी पार्टी - 0 जागा मिळण्याचा अंदाज
 4. इतर - 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज

गुजरात एक्झिट पोल - कोणत्या पक्षाला किती जागा?

 1. भाजप - 135 ते 141 जागा मिळण्याचा अंदाज
 2. काँग्रेस - 30 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज
 3. आम आदमी पार्टी - 10 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज
 4. इतर - 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज

Mudra Loan: बिझनेस वाढवायचा आहे? काळजी नको, सरकार 'या' योजनेतून त्वरीत देईल 10 लाख रुपयांचे कर्ज

Business Ideas: पुष्पा चित्रपटाच्या लाल चंदनासारखा पैसा आहे या व्यवसायात...आयुष्यभर कमाईच कमाई

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी