IAF AN-32: १५ गिर्यारोहकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू 

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 20:56 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

IAF AN-32: एएन-३२ विमानाच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. यासाठी १५ गिर्यारोहकांची मदत घेतली जात आहे. ज्यातले काही गिर्यारोहक घटनास्थळी दाखल झाले आहे. अन्य अजूनही आपल्या मोहिमेत व्यस्त आहेत.

Indian Air Force
IAF AN-32: १५ गिर्यारोहकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू   |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्लीः  गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झालेले एएन-३२ विमानाचे अवशेष अरूणाचल प्रदेशमध्ये सापडले. त्यानंतर या विमानातून प्रवास करणारे प्रवासी जिवंत आहे की नाही याचा तपास करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या बचावकार्यासाठी दल घटनास्थळावरून रवाना झालेत. हवाई दलाचे एएन-१७ विमानानं मंगळवारी एएन-३२ या विमानाचे अवशेष अरूणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागातील जंगलांमध्ये पाहिले होते. त्यानंतर विमानातून प्रवास करणारे प्रवाशी जिंवत असणाच्या शक्यतेचा शोध घेण्यासाठी वेगानं कार्य सुरू करण्यात आलं आहे. 

रशिया निर्मित एएन-३२ विमान आसामच्या जोरहाट येथून  रडारवरून गायब झालं होतं. हे विमान चीनच्या सीमेजवळ मॅन्चुका एजवांस्ड लँडिंग ग्राऊंडमध्ये जात होतं. मात्र उड्डाण घेतल्यानंतर ३३ मिनिटांच्या आत दुपारच्या वेळेत जवळपास एक वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून या विमानाचा संपर्क तुटला होता. या घटनेच्या आठ दिवसांनंतर मंगळवारी हवाई दलानं अरूणाचल प्रदेशच्या टाटोच्या उत्तर-पूर्व आणि लिपोच्या उत्तरमध्ये १६ किलोमीटर हून दूर समुद्र सपाटीपासून जवळपास १२ हजार फूट उंचावरून विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली. 

विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी गिर्यारोहकांची मदत घेतली जात आहे. यात हवाईदलाचे ९ गिर्यारोहक, लष्कराचे ४ गिर्यारोहक आणि दोन सामान्य गिर्यारोहकांचा समावेश आहे. त्यांना सर्व आवश्यक उपकरणांसह घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलं आहे. यातील काही गिर्यारोहक घटनास्थळापर्यंत पोहोचले आहे. तर अन्य काही गिर्यारोहक आपल्या मदत कार्यात व्यस्त आहेत. 

Indian Air Force

दरम्यान एएन-३२ या विमानातून प्रवास करणारे लोकं जिंवत असण्याची शक्यता खूप कमी आहे. तरी सुद्धा बचाव दल पूर्णपणे त्यात गुंतलेला आहे. विमान गायब झाल्यापासून मंगळवारी याचे अवशेष सापडण्यापर्यंत या दिशेनं  सातत्यानं झालेल्या प्रयत्नांसाठी ईस्टर्न एअर कमांडचे एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एयर मार्शल आरडी माथुर यांनी कौतुक केलं आहे. 

AN32Aircraft

AN32Aircraft 15 mountaineers

इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत

गेल्या आठ दिवसांत एएन-३२ विमानाचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता. पण, पण खराब हवामानामुळे शोध कार्यात अडथळे येत असल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले होते. विमानात एकूण १३ जण होते. विमानातील सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले. एएन-३२ हे रशियन बनावटीचे हवाई दलातील प्रवासी विमान होते. या विमानाच्या शोधासाठी एसयू-३० जेट लढाऊ विमान, सी१३०जे, एमआय १७  आणि एएलएच हेलिकॉप्टर पाठवण्यात आली होती. 

आसाममधील जोरहाटपासून अरुणाचलप्रदेशमधील मेचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड या परिसरात विमानाची शोध मोहीम राबवण्यात येत होती. यासाठी इस्त्रोच्या सॅटेलाईटने काढलेल्या फोटोंचाही आधार घेण्यात येत होता. कार्टोसॅट आणि आरआयसॅट या उपग्रहांच्या माध्यमातून फोटो घेण्यात आले होते. वायू दलाचे माजी एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ मार्शल आर. डी. माथूर हे या बचाव आणि शोध मोहिमेचे प्रमुख होते. सध्या वायु दलाचे अधिकारी बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IAF AN-32: १५ गिर्यारोहकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू  Description: IAF AN-32: एएन-३२ विमानाच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. यासाठी १५ गिर्यारोहकांची मदत घेतली जात आहे. ज्यातले काही गिर्यारोहक घटनास्थळी दाखल झाले आहे. अन्य अजूनही आपल्या मोहिमेत व्यस्त आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles