Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Jaisalmer Rajasthan, inquiry ordered : जैसलमेर : भारत - पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानमध्ये असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात भारताचे मिग २१ लढाऊ विमान कोसळले. ही घटना शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली. सरावासाठी उड्डाण सुरू असताना विमान कोसळले. या दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला.
जैसलमेरमधील दुर्घटनेची नियमानुसार चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल; असे भारतीय हवाई दलाने (वायुदल) ट्वीट करुन जाहीर केले. मिग २१ विमान शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळुच्या टेकड्यांवर कोसळले.
मिग ही सोविएत रशियाच्या काळातील विमानं आहेत. रशियाच्या विघटनानंतर या विमानांशी संबंधित सुटे भाग मिळवणे कठीण झाले. शिवाय तंत्रज्ञान जुने झाल्यामुळे अनेकदा मिग विमानांची डागडुजी करणे कठीण होते. मिग विमानांच्या दुर्घटनांमागे हे एक कारण आहे. पण ताज्या दुर्घटनेचे कारण चौकशीतून स्पष्ट होईल. भारत सरकार टप्प्याटप्प्याने मिग विमानांचा ताफा देशाच्या वायुदलातून निवृत्त करत आहे. मिग विमानांची जागा आधुनिक विमानांचा ताफा घेत आहे.