Army Dog Axel Gallantry Award : भारतीय सैन्यातील श्वानाला मरणोत्तर शौर्य पुरस्कार, वाचा ‘एक्सेल’च्या शौर्याची अद्बूत कहाणी

भारतीय सैन्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या एक्सेल नावाच्या श्वानाला मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक्सेलला हौतात्म्य आलं होतं.

Army Dog Axel Gallantry Award
भारतीय सैन्यातील श्वानाला मरणोत्तर शौर्य पुरस्कार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सैन्यातील श्वानाला शौर्य पुरस्कार
  • मरणोत्तर शौर्य पुरस्काराने होणार सन्मान
  • दहशतवाद्यांच्या गोळीने झाला होता शहीद

Army Dog Axel Gallantry Award : आतापर्यंत आपल्या वीरतापूर्ण कामगिरीसाठी शौर्य पुरस्कार मिळवलेले अनेक भारतीय जवान आपण पाहिले असतील आणि त्यांच्या शौर्याच्या गाथाही ऐकल्या असतील. यावेळी याच यादीत आपल्या जवानांसोबत एका श्वानानेही (Indian Army Dog) मरणोत्तर (Posthumously) हा पुरस्कार पटकावला आहे. आपल्या अजोड कामगिरीने भारतीय सैन्याची वारंवार मदत करणाऱ्या आणि कर्तव्यावर असतानाच हौतात्म्य आलेल्या एक्सेल (Axel) नावाच्या श्वानाला यंदा शौर्य पुरस्काराची (Gallantry Award) घोषणा करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असणाऱ्या नक्षलविरोधी अभियानात अनेकदा दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी एक्सेलचं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. एका दहशतवादविरोधी चकमकीत गोळी लागल्यामुळे एक्सेलला वीरमरण आलं होतं. 30 जुलै रोजी दहशतवाद्यांविरोधात सुरू असणाऱ्या चकमकीत एक्सेलचा गोळी लागून मृत्यू झाला होता. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतीय सैन्याच्या या श्वानाचा मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. 

अनेकदा लावला दहशतवाद्यांचा शोध

‘एक्सेल’ हा 29 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होता. जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये एक्सेलने त्याच्या गुणांचं आणि शौर्याचा वापर करून भारतीय सैनिकांना मदत केली होती. अनेकदा दहशतवाद्यांचा मागमूस काढण्यासाठी एक्सेलचा फायदा होत आहे. नेमक्या कुठल्या घरात दहशतवादी लपले आहेत, हे एक्सेल वासावरून बरोबर ओळखत असे आणि भारतीय सैनिकांना त्या घरापर्यंत घेऊन जात असे. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत भारतीय सैनिकांची चकमक सुरू होई आणि दहशतवादी ठार मारले जात. अशा कित्येक दहशतवादविरोधी कारवाया एक्सेलमुळे पूर्णत्वाला गेल्या होत्या. 

अधिक वाचा - Google Doodle: Google कडूनही 15 ऑगस्ट साजरा, सर्च इंजिन दिसलं रंगीबेरंगी रंगात; स्पेशल Doodle

30 जुलै रोजी आले वीरमरण

अनेकदा एक्सेल वास काढत आपल्या जवानांना दहशतवाद्यांच्या अगदी जवळ पोहोचवत असे. 30 जुलै रोजीदेखील नेहमीप्रमाणे दहशतवाद्यांचा मागमूस काढत एक्सेल भारतीय जवानांना ते लपलेल्या घरापर्यंत घेऊन गेला. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत भारतीय सैनिकांची चकमक सुरू झाली. या चकमकीत दहशतवाद्यांनी एक्सेलला टार्गेट केले आणि त्याला गोळी घालण्यात आली. त्यात एक्सेल गंभीर जखमी झाला आणि अखेर शहीद झाला. त्यानंतर भारतीय सैन्यानं एक्सेलला श्रद्धांजली वाहिली. बारामुलात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या एक्सेलच्या शौर्याला आणि बलिदानाला चिनारकॉर्प्स सेना सलाम करत असल्याचं ट्विट करण्यात आलं होतं. 

अधिक वाचा - Independence Day: स्वातंत्र्यदिनाचा महोत्सव साजरा करण्यासाठी अमेरिकाही भारतासोबत;महात्मा गांधींच्या तत्वांचा बायडेनकडून गौरव

107 जणांना शौर्य सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 107 शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये तीन कीर्ती चक्र, 13 शौर्य चक्रं, दोन ‘बार टू सेना’ मेडल, 81 सेना मेडल, एक नौदल मेडल आणि वायूदल मेडल यांचा समावेश आहे. यात एक्सेल श्वानाचाही समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी