भूतानमध्ये चीता हेलिकॉप्टर कोसळलं, दोन पायलट शहीद 

भारतीय लष्कराचं एक हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळलं. ज्यात लष्कराचे दोन पायलट शहीद झाले आहेत. लष्कराच्या ट्रेनिंग टीमचं हे हेलिकॉप्टर होतं. आज दुपारी 1 वाजता भूतानच्या योंगफुला येथे ही दुर्घटना घडली.

 Cheetah helicopter
भूतानमध्ये चीता हेलिकॉप्टर कोसळलं, दोन पायलट शहीद   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भूतानमध्ये भारतीय लष्कराचं एक चीता हेलिकॉप्टर कोसळलं.
  • या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे दोन पायलट शहीद झालेत.
  • यावर्षींच्या जून महिन्यात अरूणाचल प्रदेशमध्ये एएन-32 विमान कोसळलं होतं.

नवी दिल्लीः  भूतानमध्ये भारतीय लष्कराचं एक चीता हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत भारतीय लष्कराचे दोन पायलट शहीद झालेत. भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्यांपैकी भारतीय लष्कराचा एक पायलट लेफ्टनंट कर्नल रॅंकचे होते. तर दुसरा पायलट हा आर्मीचा पायलट होता जो भारतीय लष्करासोबत प्रशिक्षण घेत होता. 

लष्कराच्या ट्रेनिंग टीमचं हे हेलिकॉप्टर होतं. हेलिकॉप्टर अरूणाचल प्रदेशच्या खिर्मूहून भूतानच्या योंफुलापर्यंतच्या उड्डाणासाठी गेलं होतं. आज दुपारी 1 वाजता भूतानच्या योंगफुला येथे ही दुर्घटना घडली. अरूणाचल प्रदेशच्या खिर्मू येथून योंगफुलाकडे जात असताना ही घटना घडली असून त्यात दोन पायलट शहीद झाल्याचं आर्मीचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं.

 

यावर्षींच्या जून महिन्यात अरूणाचल प्रदेशमध्ये एएन-32 विमान कोसळलं होतं. ज्यात प्रवास करणाऱ्या 13 जणांचा मृत्यू झाला होता. विमान कोसळल्यानंतर 10 दिवसानंतर साहित्य सापडलं होतं. 

ही पहिलीच वेळ नाही आहे की, जे लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पश्चिम बंगालच्या सुकना सैन्य शिबिरात चीता हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यात लष्कराच्या तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि एक ज्युनिनर कमिशन अधिकारी खूप गंभीर जखमी झाला होता. हेलिकॉप्टर आपल्या नेहमीच्या मिशनवर होता. मात्र सिलिगुडीच्या जवळ सुकनाहून परत येत असताना ते कोसळलं. 

विमान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याची २०१९ या वर्षातली ही ११ वी घटना आहे. यावर्षी ९ लढाऊ विमानं आणि २ हेलिकॉप्टर कोसळलं. त्यात १२ जणांचे जीव गेलेत. याआधी रायगड जिल्ह्यातल्या मुरूडजवळच्या नांदगावात तटरक्षक दलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील एका महिलेसह तीन जण जखमी झाले होते. 

ऑक्टोबर २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बरेली बेसच्या जवळच एक चीता हेलिकॉप्टर कोसळलं होतं. ज्यात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला होता. दरम्यान आधीच्या बुधवारी भारतीय हवाई दलाचं एक मिग २१ विमान ग्वालियर विमानतळजवळ क्रॅश झालं होतं. यात दोन्ही पायलटर्संना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी