Army Day 15 January : भारतीय सेनेच्या शानदार योगदानाचा अभिमान, पीएम मोदींनी दिल्या सेना दिनाच्या शुभेच्छा

Indian Army Day 2022 pm narendra modi tweet Best wishes on the occasion of Army Day to our courageous soldiers : देश आज सेना दिवस  साजरा करत आहे. दरवर्षी भारतात १५ जानेवारी रोजी सेना दिन अर्थात सेना दिवस साजरा करतात. यंदा आज (शनिवार १५ जानेवारी २०२२) सेना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त ट्वीट करुन भारतीय सैन्याला शुभेच्छा दिल्या.

Indian Army Day 2022 pm narendra modi tweet Best wishes on the occasion of Army Day to our courageous soldiers
पीएम मोदींनी दिल्या सेना दिनाच्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रपतींनी दिल्या सेना दिवसाच्या शुभेच्छा
  • पीएम मोदींनी दिल्या सेना दिनाच्या शुभेच्छा
  • भारतीय सेनेच्या शानदार योगदानाचा अभिमान - पीएम मोदी

Indian Army Day 2022 pm narendra modi tweet Best wishes on the occasion of Army Day to our courageous soldiers : नवी दिल्ली : देश आज सेना दिवस  साजरा करत आहे. दरवर्षी भारतात १५ जानेवारी रोजी सेना दिन अर्थात सेना दिवस साजरा करतात. यंदा आज (शनिवार १५ जानेवारी २०२२) सेना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त ट्वीट करुन भारतीय सैन्याला शुभेच्छा दिल्या.


भारतीय सैन्याने परदेशात (विदेश) शांतीसेना म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रसंगी शत्रुच्या प्रदेशातही आपत्ती आल्यास भारतीय सैन्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत केली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे रक्षण आणि आपत्ती काळात नागरिकांची मदत करत भारत सैन्य आपले देशाच्या संरक्षणाचे कार्य करत आहे. या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.

भारताचे साहसी सैनिक, सन्मानीय दिग्गज आणि शूरवीर सैनिकांचे कुटुंबीय या सर्वांना सेना दिवसाच्या पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सैन्य त्याच्या शौर्यासाठी आणि कामाप्रती असलेल्या सर्वोच्च निष्ठेसाठी ओळखले जाते. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्याने दिलेल्या अमूल्य योगदानाचे वर्णन शब्दांमध्ये करणे कठीण आहे. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैन्याने कर्तव्य चोख बजावले आहे. आपत्ती आल्यास नागरिकांना मदत करण्यास सैन्य कायम आघाडीवर राहिले आहे. या कार्याची दखल पंतप्रधान मोदी यांनी सैन्याला शुभेच्छा देताना घेतली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सैन्य दिनानिमित्त आजी माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. देश सुरक्षित राहावा यासाठी सैन्याने सर्वोच्च योगदान दिल्याचे राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशामध्ये नमूद केले आहे. 

सेना दिवसानिमित्त लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र ठेवले. 

फील्ड मार्शल केएम करियप्पा यांनी ब्रिटनच्या जनरल फ्रांसिस बुचर यांच्याकडून १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याचे नेतृत्व हाती घेतले. फील्ड मार्शल केएम करियप्पा हे भारतीय सैन्याचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. या घटनेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय सैन्य आपला स्थापना दिन अर्थात सेना दिन (सेना दिवस) साजरा करते. यंदा भारतीय सैन्याचा ७४वा स्थापना दिवस आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी