भारतीय सैन्याची मोठी कारवाई, लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा

भारतीय सैन्याने लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आसिफ याचा खात्मा केला आहे. दहशतवादी आसिफ हा गेल्या एक महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय होता आणि मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना करत असल्याची माहिती होती.

Indian Army
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा भारतीय सैन्याने केला खात्मा
  • दहशतवादी आसिफ गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये होता सक्रिय

जम्मू-काश्मीर: भारतीय सैन्याने एक मोठी कारवाई करत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आसिफ याचा खात्मा केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवादी आसिफ याला कंठस्नान घातलं आहे. दहशतवादी आसिफ याने काही दिवसांपूर्वी सोपोर येथे एका फळ व्यापारीची आणि त्याच्या परिवारातील तीन सदस्यांवर गोळ्या झाडून हत्या केली होती. या गोळीबारात एक लहान मुलगी सुद्धा जखमी झाली होती.

रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आसिफ याने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तो जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय होता. भारतीय सैन्याने आज केलेल्या कारवाईत दहशतवादी आसिफ याचा खात्मा केला. भारतीय सैन्याकडून सुरू असलेल्या या कारवाईत भारतीय सैन्य दलातील दोन जवानही जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (डीजीपी) दिलबाग सिंह यांनी सांगितले की, 'लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आसिफ याने सोपोर येथे खूपच दहशत पसरवली होती. गेल्या महिन्याभरापासून तो अधिकच सक्रिय झाला होता. आसिफने ओव्हर ग्राऊंड वर्कर्सचा उपयोग करुन नागरिकांना धमकावण्यास सुरूवात केली होती ज्यामुळे नागरिक आपले दैनंदिन कार्य करु शकत नव्हते, दुकाने सुरू करु शकत नव्हते'.


दिलबाग सिंह यांनी पुढे म्हटलं की, 'आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली की आसिफ एका ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आम्ही सर्व ठिकाणी तपास सुरू केला आणि आसिफचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान आसिफने आमच्यावर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. जम्मूमधील सर्व १० जिल्ह्यांत परिस्थिती सामान्य आहे आणि सर्व शाळा, कॉलेज, कार्यालय सुरू आहेत'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...