EXCLUSIVE: भारतीय सैन्याची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त [VIDEO]

EXCLUSIVE VIDEO: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या काही चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. याच चौक्यांच्या सहाय्याने पाकिस्तानी सैन्य भारतीय गावांना लक्ष्य करत फायरिंग करत असत आणि दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करत.

Pakistani post destroyed
पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भारताने पाकिस्तानच्या चौक्या केल्या उद्धवस्त
  • भारतीय गावांवर गोळीबार आणि घुसखोरीसाठी पाकिस्तान करत होता वापर
  • भारतीय सैन्याची मोठी कारवाई
  • भारतीय सैन्याच्या कारवाईचा एक्सक्लुझीव्ह व्हिडिओ टाइम्स नाऊकडे

नवी दिल्ली: पाकिस्तानचं नापाक कृत्य सुरूच असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत वारंवार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या याच कृत्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. भारतीय सैन्याने केलेल्या या कारवाईचा एक्सक्लुझीव्ह व्हिडिओ टाइम्स नाऊला मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याच्या या चौक्या लीपा घाटी येथील पांडू क्षेत्र परिसरात होत्या. या चौक्यांच्या माध्यमातून दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करत असतं. पाकिस्तानच्या या चौक्यांकडून भारतीय हद्दीत गोळीबार करत ग्रामस्थांना टार्गेट केलं जात असे. तर त्याचवेळी दहशतवादी भारतात घुसखोरी करत असत.

गुजरातमधील सरक्रीक येथे पाकिस्तानच्या काही संशयास्पद हालचाली झाल्याचं दिसून आलं आहे. भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी या प्रकरणी माहिती देत म्हटलं की, आमच्याकडे माहिती मिळाली आहे की, भारताच्या दक्षिणी भागात एक दहशतवादी हल्ला होऊ शकतो. सर क्रीकच्या माध्यमातून काही होड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांकडून कुठल्याही प्रकरचं कृत्य होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या संदर्भातील प्रस्ताव मोदी सरकारने प्रथम राज्यसभेत मांडला आणि त्यावर चर्चा होऊन तो मंजूर झाला. त्यानंतर हा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला आणि तेथे सुद्धा बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तान सरकार चांगलाच भांबावलं आहे. पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत दहशतवादी हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न भारतीय सैन्य दल मोडून काढत त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
EXCLUSIVE: भारतीय सैन्याची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त [VIDEO] Description: EXCLUSIVE VIDEO: भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या काही चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. याच चौक्यांच्या सहाय्याने पाकिस्तानी सैन्य भारतीय गावांना लक्ष्य करत फायरिंग करत असत आणि दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी