रशिया-युक्रेन लढाईतून भारताने घेतला धडा

Indian Army to incorporate lessons from Russia-Ukraine as anti tank missiles achieve significant success against armour : रशिया-युक्रेन लढाईतून भारताने धडा घेतला आहे. भारतीय संरक्षण विभाग रशिया-युक्रेन लढाईवरून स्वतःच्या तंत्रज्ञानातील दोष शोधून ते दुरुस्त करण्यात मग्न आहे. 

Indian Army to incorporate lessons from Russia-Ukraine as anti tank missiles achieve significant success against armour
रशिया-युक्रेन लढाईतून भारताने घेतला धडा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रशिया-युक्रेन लढाईतून भारताने घेतला धडा
  • भारताच्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाची योजना तयार करण्यासाठी रशिया-युक्रेन संघर्ष एक महत्त्वाचा संदर्भ
  • भारतीय संरक्षण विभाग रशिया-युक्रेन लढाईवरून स्वतःच्या तंत्रज्ञानातील दोष शोधून ते दुरुस्त करण्यात मग्न

Indian Army to incorporate lessons from Russia-Ukraine as anti tank missiles achieve significant success against armour : नवी दिल्ली : रशिया-युक्रेन लढाईतून भारताने धडा घेतला आहे. भारतीय संरक्षण विभाग रशिया-युक्रेन लढाईवरून स्वतःच्या तंत्रज्ञानातील दोष शोधून ते दुरुस्त करण्यात मग्न आहे. 

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात रशियाचे रणगाडे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांना बळी पडत असल्याचे दिसत आहे. यातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला आहे. रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांपासून रणगाड्यांचे रक्षण करण्यासाठी भारत आधुनिकीकरणाची योजना राबविणार आहे. या अंतर्गत रणगाड्यांचे चिलखत वजनाने हलके पण जास्तीत जास्त स्फोटकांचा भार झेलून प्रदीर्घ काळ सुरक्षित राहण्यासाठी सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. एकाचवेळी एक किंवा त्यापेक्षा जास्त रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्यास त्यांचा प्रतिकार करण्यासाठी रणगाड्यांमध्ये आधुनिक स्वयंचलित यंत्रणा बसविण्याची तयारी सुरू आहे. रणगाडा वेगाने हालचाल करून शत्रूवर घातक प्रहार करण्यासाठी सक्षम करण्यावरही भारताचे संरक्षण तज्ज्ञ भर देत आहेत. रणगाडे आणि ड्रोन सारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक रडार, स्वयंचलित गन्स, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र यांची क्षमता वाढविण्यावरही भारत काम करत आहे.

जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून आकाशात आणि आकाशातून जमिनीवर या तीन प्रकारच्या लढाईसाठी भारत तंत्रज्ञानात काय बदल करायचे याचा अभ्यास करून वेगाने कामाला लागला आहे. भारतात रशियन बनावटीची शस्त्रे मोठ्या संख्येने आहेत. मागील अनेक दशकांपासून संरक्षण साहित्यासाठी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. भारतात असलेले अनेक टी९०, टी७२ आणि बीएमपी रणगाडे हे मूळचे रशियन आहेत. भारत टप्प्याटप्प्याने या रणगाड्यांमध्ये संशोधन करून स्वदेशी रणगाडे विकसित करत होता. आता भारताच्या संरक्षण तज्ज्ञांनी संरक्षण साहित्याच्या संशोधन, विकास आणि निर्मिती प्रक्रियेला वेग देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

आधी भारतीय रणगाडे फक्त भारत-पाकिस्तान सीमेवरील मैदानी भागांमध्ये, जंगलांमध्ये तसेच वाळवंटात कार्यरत असायचे. पण मागील काही वर्षांपासून भारतीय रणगाडे पाकिस्तान व्यतिरिक्त भारत-चीन सीमेवर ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. लडाख पासून सिक्कीम पर्यंत भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणी रणगाडे आहेत. यामुळेच भारताने रशिया-युक्रेन लढाईतून धडा घेऊन वेगाने आधुनिकीकरण सुरू केले आहे. संरक्षण व्यवस्था सुरळीत राहील याचे भान ठेवून टप्प्याटप्प्याने पण वेगाने आधुनिकीकरण करण्यावर भारताचा भर आहे.

युक्रेनमध्ये रशिया वापरत असलेल्या अनेक रणगाड्यांची रचना तीस ते चाळीस वर्षांपूर्वीची आहे. याउलट पाश्चात्य देशांनी युक्रेनला पुरविलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान मागील दहा-वीस वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहे. युक्रेनमध्ये सध्या कार्ल गुस्ताफ अँटी टँक रॉकेट लाँचर, NLAWs आणि AT-4s यांच्यासारख्या अँटी टँक आणि अँटी एअरक्राफ्ट उपकरणांचा प्रभाव दिसत आहे. अर्थात जिथे रणगाडे मागे पडत आहेत तिथे रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले तसेच हवाई हल्ले यांच्या मदतीने रशिया वारंवार स्वतःची बाजू भक्कम करताना दिसत आहे. 

भारताचे तज्ज्ञ रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षाच्या सतत बदलत्या स्वरुपावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारताच्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाची योजना तयार करण्यासाठी या संघर्षाचा काही बाबतीत महत्त्वाचा संदर्भ म्हणून भारताचे तज्ज्ञ उपयोग करून घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी