indias biggest gold mine देशातील सर्वात गरीब राज्यात सोन्याचा सर्वात मोठा साठा

जमुई जिल्ह्यातील करमटिया गावात सोनं असल्याचे अनेक वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. इथले ग्रामस्थ पूर्वी माती चाळून सोन्याचे छोटे छोटे तुकड मिळवायचे indian biggest gold mine found in bihar

Multibagger Stock
माती चाळून मिळवायचे सोनं 
थोडं पण कामाचं
  • बिहारच्या एका गावात मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचे समोर आले आहे.
  • भागात देशातील ४४ टक्के सोनं आहे असे सांगण्यात येत आहे.
  • केंद्र सरकारनेही या माहितीला दुजोरा दिला आहे. 

indias biggest gold mine : पाटणा  :  काही वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) उन्नावमध्ये(unnao)  एक हजार टन सोने (gold) असल्याची माहिती समोर आली होती. हे सोनं जर सरकारला मिळाले असते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला (economy) बळ मिळाले असते. परंतु शासनाने या भागात खोदकाम केल्यानंतर ही अफवा असल्याचे समोर आले. असे असले तरी बिहारच्या एका गावात मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर केंद्र सरकारनेही या माहितीला दुजोरा दिला आहे.  बिहारच्या (bihar) या भागात देशातील ४४ टक्के सोनं आहे असे सांगण्यात येत आहे.

indian biggest gold mine found in bihar

बिहारच्या जमुई भागात सोन्याचा मोठा साठा

बिहारच्या जमुई जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा साठा आहे.  बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार संजय जयस्वाल यांनी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडे याबाब प्रश्न विचारला होता. त्यावर कोळसा व संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. एका पत्रात त्यांनी बिहारमध्ये देशातील सोन्याचा सर्वात मोठा साठा असल्याचे मान्य केले होते.

प्रल्हाद जोशी यांनी संसदेत दिली माहिती

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एका लेखी उत्तरात म्हटले होते की देशात एकूण ५०१.८३ दशलक्ष टन संसाधन आहेत. तर त्यापैकी ६५४.७४ टन सोन्याचा साठा आहे. बिहारमध्ये या सोन्या पैकी २२२.८८५ दशलक्ष टन सोने आहे आहे जोशी यांनी म्हटले आहे.

 मातीत सापडतं सोनं

आज जरी सरकारने या माहितीला दुजोरा दिला असला तरी इथल्या भागातील अनेक नागरिकांना याबद्दल माहित आहे. अनेक लोकांना लहाणपणी मातीत चमकणारे धातू सापडले आहे. या भागातील प्रत्येक ८ किमी भागात हा चमकणारा धातू दिसतो. १५ वर्षांपूर्वी कोलकातातून एक टीम या गावात सर्वेक्षणासाठी आली  होती. तेव्हाच या भागात सोन्याचा साठा असल्यावर शिक्कामोर्तब झालेहोते.

माती चाळून मिळवायचे सोनं

जमुई जिल्ह्यातील करमटिया गावात सोनं असल्याचे अनेक वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. इथले ग्रामस्थ पूर्वी माती चाळून सोन्याचे छोटे छोटे तुकड मिळवायचे आणि बाजारात जाऊन विकायचे. अनेक गावकरी गावातील नदीत चाळणी घेऊन जायचे आणि सोनं शोधून काढायचे. यामुळे अनेकांचे उदरनिर्वाह चालायचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी