Helicopter Crash -  देशाचे पहिले CDS बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमार ऑपरेशनचे केले होते नेतृत्व

आज तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये १४ प्रवासी होते. cds bipin rawat died in helicopter crash

bipin rawat
देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत 
थोडं पण कामाचं
  • हेलिकॉप्टर अपघातात रावत यांचा मृत्यू
  • देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत
  • जनरल रावत यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल स्ट्राईक

cds bipin rawat died in helicopter crash : नवी दिल्ली: आज तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये १४ प्रवासी होते त्यात रावत यांच्या पत्नीही होती. या अपघातात रावत यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत

जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. ३१ डिसेंबेर २०१९ रोजी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झाले होते. ३१ डिसेंबर २०१६ रोजी ते सैन्यप्रमुख झाले होते जनरल रावत यांना एलओसी, कश्मीर खोरे आणि ईशान्येकडील भागात कामाचा मोठा अनुभव होता. अशांत भागात काम करण्याचा त्यांचा अनुभव पाहून केंद्र सरकारने त्यांच्याकडे सैन्याची धुरा सोपवली होती.
 

जनरल रावत यांच्या नेतृत्वाखाली सर्जिकल स्ट्राईक

भारतीय सैन्याने २९ सप्टेंबर रोजी पाकव्याक्त कश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले होते. जनरल रावत यांनी सैन्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एका महिन्यातच त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ऊरी येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याचे प्रत्युत्तर म्हणून सैन्याने ही कारवाई केली होती. तसेच पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सैन्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. तेव्हा बालकोटवर एअर स्ट्राईक करून सैन्याने पुन्हा दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले होते. त्यान अनेक दहशतवादी ठार झाले होते.

म्यानमार ऑपरेशनचेही नेतृत्व

२०१५ साली मणिपूरमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. तेव्हा २१ जवानांनी सीमेपार जाऊन म्यानमारमध्ये लपलेल्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या ऑपरेशनचे नेतृत्वही रावत यांनी केले होते.  

देशसेवेचा वारसा जपला

जनरल रावत यांना देशसेवेचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडिल लेफ्टनंटर जनरल लक्ष्मण सिंह्ह रावत १९८८ साली सैन्यातून निवृत्त झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी