YouTube Channels Banned : केंद्र सरकारकडून २२ युट्युब चॅनेल्सवर बंदी, ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश

केंद्र सरकारने देशविरिधी आशय पसरवल्याप्रकरणी २२ युट्युब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. यात ४ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सचाही समावेश आहे. या युट्युब चॅनेल्सची कोट्यवधींच्या संख्येत व्ह्युज होते. तसेच केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव तीन ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्युज वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत

youtube channel
२२ युट्युब चॅनेल्सवर बंदी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने देशविरिधी आशय पसरवल्याप्रकरणी २२ युट्युब चॅनेल्सवर बंदी आणली आहे.
  • यात ४ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सचाही समावेश आहे.
  • या युट्युब चॅनेल्सची कोट्यवधींच्या संख्येत व्ह्युज होते.

YouTube Channels Ban: नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशविरिधी आशय पसरवल्याप्रकरणी २२ युट्युब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. यात ४ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सचाही समावेश आहे. या युट्युब चॅनेल्सची कोट्यवधींच्या संख्येत व्ह्युज होते. तसेच केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव तीन ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्युज वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या युट्युब चॅनेल्स आणि सोशल मीडिया अकांऊट्सवर भारताची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि कायदा सुव्यस्थेबद्दल खोट्या माहिती प्रसारित होत्या. (indian government ban 22 youtube channels and social media accounts)

भारतीय युट्युब चॅनेल्सवर कारवाई

माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ नुसार पहिल्यांदाच भारतीय युट्युब चॅनेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ ची सूचना जारी केले होती. नव्या निर्णयानुसार १८ भारतीय आणि ४ पाकिस्तीन युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या युट्युब चॅनेल्सवर फेक न्युज पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या युट्युब चॅनेलवर जम्मू कश्मीर मुद्द्यावर खोट्या बातम्या प्रसारित होत होत्या. त्यांच्या सोशल मीडियावर अकांटवर भारत विरोधी कंटेट पोस्ट करण्यात येत होता. अनेक भारतीय युट्युब चॅनेलवर युक्रेन रशिया युद्धावार खोट्या आणि चुकीच्या बातम्या दिल्या गेल्या होत्या. 


या भारतीय चॅनेल्सवर बंदी

ARP News, AOP News, LDC News, Sarkari Babu, SS ZONE Hindi, Smart News, News23 Hindi, Online Khabar, DP news, PKB News, Kisan Tak, Borana News, Sarkari News Update, Bharat Mausam, RJ ZONE 6, Exam Report, Digi Gurukul, 

हे पाकिस्तानी युट्युब चॅनेल्स बॅन

Duniya Mery Aagy, Ghulam Nabi Madni, HAQEEQAT TV, HAQEEQAT TV 2.0

वेबसाइट्स 

Dunya Mere Aagy

या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी

ट्विटर- Ghulam Nabi Madni, Dunya Mery Aagy, Haqeeqat TV 
फेसबुक- Dunya Mery AagyLive TV

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी