Jammu Kashmir: दक्षिण काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात प्रशासनाने दहशतवाद्याच्या घरावर मोठी कारवाई करत बुलडोझर चालवला आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी हिज्बुल मुझाहिद्दीन याचा दहशतवादी कमांडरच्या घरावर कारवाई केली आहे. दहशतवाद्याच्या घरातील परिसरातील भिंत प्रशासनाने बुलडोझर चालवून पाडली आहे. (Indian government big action against hizbul ul mujahideen terrorist his compound wall demolished in Jammu Kashmir)
अधिकाऱ्यांच्या संयुक्त टीमने अनंतनाग येथील गावात एका मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत ही कारवाई केली आहे. हिज्बुल -मुझाहिद्दीनचा गुलाम नबी खान याच्या घराची भिंत पूर्णपणे पाडण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिक्रमण झालेली ही भिंत होती आणि ही भिंत सरकारी जमीनवर बांधण्यात आली होती.
Jammu and Kashmir Administration demolishes property of Hizbul Mujahideen terrorist commander Amir Khan, in Anantnag's Pahalgam pic.twitter.com/x1F28YFwAK — ANI (@ANI) December 31, 2022
हे पण वाचा : महिलांनी चुकूनही या 5 गोष्टी कोणालाही देऊ नका अन्यथा होईल अनर्थ
दहशतवादी गुलाम नबी खान उर्फ आमिर खान उर्फ सैफुल्ला खालिद हिज्बुल-मुझाहिद्दीन हा दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून तो आपल्या हालचाली चालवतो. दहशतवादी 90च्या दशकात पीओकेमध्ये गेला होता आणि तेव्हापासून तो तेथे कार्यरत आहे. स्थानिक पंचायतीने दहशतवादी कमांडरच्या घरावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर ही कारवाई केली आहे. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरमी हिज्बुल कमांडर विरुद्ध एफआयआर सुद्धा नोंदवण्यात आला आहे.
हे पण वाचा : फाटलेल्या नोटा बदलून घेण्याचं नका घेऊ टेन्शन, या ठिकाणी करा एक्सचेंज
2014 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने लिवर पहलगाम येथील त्याची 12 कनाल शेतजमीन जप्त केली होती. काही आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी पुलवामा जिल्ह्यातील जैश-ए-मोहम्मद कमांडर आशिक निग्रो याच्या घरावरही बुलडोझर चालवला होता. काश्मीरमध्ये जैशसाठी काम करणाऱ्या निग्रो याने सरकारी जमीनीवर घर बांधले होते.