भारतीय नौदलाला मिळाली नवी शक्ती, DRDA कडून सुपरसॉनिक क्षेपणास्त्र टॉर्पेडोची यशस्वी चाचणी

India Test Supersonic Missile Assisted Torpedo भारताची सामरिक शक्ती आणखी वाढली आहे. लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पेडोची मंगळवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारतीय नौदलाच्या पाणबुडी युद्धाला बळ देण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना आणि विकास करण्यात आल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र पारंपरिक टॉर्पेडोपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.

 Indian Navy gets new strength, DRDA successfully tests supersonic missile torpedo
भारतीय नौदलाला मिळाली नवी शक्ती, DRDA कडून सुपरसॉनिक क्षेपणास्त्र टॉर्पेडोची यशस्वी चाचणी ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुपरसॉनिक मिसाईल टॉर्पेडोची यशस्वी चाचणी
  • भारताची सामरिक शक्ती आणखी वाढली आहे.
  • भारतीय नौदलाच्या पाणबुडी युद्धाला बळ देण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना आणि विकास करण्यात आल्याचे डीआरडीओने म्हटले आहे.

India Test Supersonic Missile Assisted Torpedo बालासोर : भारताने मंगळवारी लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची (Supersonic Missile) सहाय्यक टॉर्पेडोची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या (Odisha) बालासोर किनाऱ्यावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (DRDO) ही माहिती दिली. भारतीय नौदलाच्या (Indian Navy) पाणबुडी (Submarine) युद्धाला बळ देण्यासाठी या क्षेपणास्त्राची (Missile ) रचना आणि विकास करण्यात आल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र पारंपरिक टॉर्पेडोपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. (Indian Navy gets new strength, DRDO successfully tests supersonic missile torpedo)

अँटी-सबमरीन वॉरफेअर ऑपरेशन, जे टॉर्पेडो श्रेणीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. SMART हे क्षेपणास्त्र हलक्या वजनाच्या अँटी सबमरीन टॉर्पेडो सिस्टिममध्ये उपयुक्त ठरेल. टॉर्पेडो हे एक स्वयं-चालित शस्त्र आहे जे पाण्याखाली मर्यादित अंतरावर आपले लक्ष्य गाठते. DRDO ने 2010 मध्ये क्षेपणास्त्रांद्वारे टॉर्पेडो सोडण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आणि या प्रणालीची पहिली चाचणी 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली.

टॉर्पेडो काय आहे

टॉर्पेडो हे सिगारच्या आकाराचे स्वयंचलित पाण्याखालील शस्त्र आहे जे पाणबुडीतून सोडले जाते. टॉर्पेडो समुद्राच्या खोलवर स्फोट करून आपले लक्ष्य गाठते. भारतातील पहिला स्वदेशी टॉर्पेडो वरुणास्त्र होता जो अँटी सबमरीन इलेक्ट्रिक टॉर्पेडो म्हणून लाँच करण्यात आला होता.


स्मार्ट क्षेपणास्त्राचे महत्त्व

हे स्मार्ट क्षेपणास्त्र हैदराबादमधील DRDO आणि संशोधन केंद्र इमरात, हवाई संशोधन आणि विकास प्रतिष्ठान, आग्रा आणि नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम यांनी विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे देशाची सामरिक ताकद वाढणार असून नौदलाची क्षमता वाढणार आहे. अँटी सबमरीन वॉरफेअरसाठी ही मोठी उपलब्धी आहे. या प्रकल्पाला 2003 मध्ये मंजुरी मिळाली होती. ही एक प्रकारची पाणबुडीविरोधी युद्धनौका आहे जी सध्या भारतीय नौदलात कार्यरत आहे. यामध्ये INS कामोर्ता, INS कदमत, INS Kilton आणि INS Kavaratti यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी