भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर? पहिल्या टप्प्यात सुनक यांना 88 मते

ब्रिटनचे (Britain) काळजीवाहू पंतप्रधान ( Former Prime Minister ) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (Conservative Party) नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान (Prime Minister) कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान निवडीसाठी मतदान केलं जात आहे. यात ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ऐतिहासिक यशाकडे आगेकूच करत आहेत. 

 Sunak becoming Britain's Prime Minister?
नारायण मूर्तीचे जावाईबापू होणार ब्रिटनचे पंतप्रधान होणार?   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बुधवारी पंतप्रधानपदाचे अंतिम उमेदवार ठरवण्यासाठी पहिल्या टप्प्याचे मतदान केले.
  • ऋषी सुनक आणि सुएला ब्रेव्हरमन हे भारतीय वंशाचे आहेत.
  • ऋषी सुनक 88 खासदारांच्या मतांसह अव्वल स्थानी राहिले.

नवी दिल्ली :  ब्रिटनचे (Britain) काळजीवाहू पंतप्रधान ( Former Prime Minister ) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे (Conservative Party) नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान (Prime Minister) कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान निवडीसाठी मतदान केलं जात आहे. यात ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ऐतिहासिक यशाकडे आगेकूच करत आहेत. 

सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने बुधवारी पंतप्रधानपदाचे अंतिम उमेदवार ठरवण्यासाठी पहिल्या टप्प्याचे मतदान केले. 30 पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा मिळवणाऱ्या एकूण 6 दावेदारांची निवड झाली. त्यात ऋषी सुनक आणि सुएला ब्रेव्हरमन हे भारतीय वंशाचे आहेत. ऋषी सुनक 88 खासदारांच्या मतांसह अव्वल स्थानी राहिले. ऋषी सुनक हे पंतप्रधान पदाच्या एक पाऊल जवळ पोहोचले आहेत. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील दोन उमेदवार बाद ठरले असून ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Also : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत,कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश

सुनक यांना एकूण मतदानाच्या 25% मते मिळाली आहेत. सुनक यांच्या सर्वात तुल्यबळ प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डान्ट 67 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिल्या. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष नव्या नेत्याची निवड करत आहे. त्याचे एकूण 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा नामांकनाचा होता, त्यात एकूण 8 दावेदार होते. दुसरा टप्पा फायनलिस्ट निश्चित करण्याचा होता, त्यासाठी दावेदाराला कमीत कमी ३० खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता. सुनक यांना सर्वात जास्त खासदारांचा पाठिंबा मिळाला. 

कोण आहेत ऋषी सुनक

मूळचे भारतीय असलेले ऋषी सुनक हे इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक हे बोरिस जॉन्सन सरकारच्या काळात अर्थमंत्री होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सुनक हे पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहेत. 42 वर्षीय सुनक यांची फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस जॉन्सन यांनी अर्थमंत्री पदी नियुक्ती केली होती. या वर्षी जानेवारीमध्ये ब्रिटनच्या एका सट्टेबाजाने बोरिस जॉन्सन राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी ऋषी सुनक पंतप्रधान बनतील, अशी भविष्यवाणी केली होती. ऋषी सुनक यांची इंग्लंडमधील राजकीय कारकीर्द अतिशय नेत्रदीपक राहिली आहे. गेल्या वेळीही ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, मात्र शेवटच्या क्षणी बोरिस जॉन्सन यांची पंतप्रधानपदी निवड झाली. 

Read Also : अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाकडून जपान पराभूत

ऋषी सुनक यांनी सुरुवातीचे शिक्षण इंग्लंडमधील 'विंचेस्टर कॉलेज'मधून केले. त्यांनी पुढील शिक्षण ऑक्सफर्डमधून केले. 2006 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवीही मिळवली. ऋषी सुनक यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. 2015 मध्ये त्यांनी रिचमंडमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. 2017 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. 13 फेब्रुवारी 2020 रोजी इंग्लंडचे अर्थमंत्री बनले होते. 

Read Also: शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात तब्बल 19 महिला

ऋषीचे पूर्वज पंजाबचे आहेत आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या सुप्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या अभ्यासादरम्यान ऋषी सुनक यांची अक्षता मूर्ती यांची भेट झाली. 2009 मध्ये बंगळुरू येथे अक्षता आणि सुनक यांनी लग्न केलं. 

पीएम पदाचे पहिल्या दावेदार टप्प्यात मते

ऋषी सुनक 88
पेनी मॉर्डांट 67
लिझ ट्रास 50
केमी बेडेनॉक 40
टॉम टुजँट 37
सुएला ब्रेव्हरमन 32

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी