Congo Violent Protests : काँगोत हिंसक आंदोलन, दोन भारतीय शांतीसैनिकांना वीरमरण

Indian Peacekeepers Killed In Congo During Anti UN Protests : काँगो या आफ्रिका खंडातील देशाच्या पूर्वेकडील भागात बुटेम्बो शहरात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्याने देशातून निघून जावे अशी मागणी करत हिंसक आंदोलन झाले. या हिंसेत तीन शांती सैनिकांना वीरमरण आले.

Indian Peacekeepers Killed In Congo During Anti Un Protests
काँगोत हिंसक आंदोलन, दोन भारतीय शांतीसैनिकांना वीरमरण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • काँगोत हिंसक आंदोलन, दोन भारतीय शांतीसैनिकांना वीरमरण
  • तीन शांती सैनिकांना वीरमरण, यापैकी दोन भारतीय
  • शिशुपाल सिंह आणि सांवळा राम अशी वीरमरण आलेल्या भारतीय शांतीसैनिकांची नावं

Indian Peacekeepers Killed In Congo During Anti UN Protests : काँगो या आफ्रिका खंडातील देशाच्या पूर्वेकडील भागात बुटेम्बो शहरात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्याने देशातून निघून जावे अशी मागणी करत हिंसक आंदोलन झाले. या हिंसेत तीन शांती सैनिकांना वीरमरण आले. वीरमरण आलेल्या तीन शांतीसैनिकांपैकी दोघे भारतीय आहेत. शिशुपाल सिंह आणि सांवळा राम अशी वीरमरण आलेल्या भारतीय शांतीसैनिकांची नावं आहेत. लवकरच त्यांचे पार्थिव मायदेशी येणार आहे. भारत सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. । शांती सेना

वीरमरण आलेले शांतीसैनिक हे काँगोत जाण्याआधी बीएसएफमध्ये कार्यरत होते. एका आंतरराष्ट्रीय कराराचा भाग म्हणून भारत नियमितपणे आपल्या सैन्य दलांतील आणि निमलष्करी दलांतील निवडक जवानांना शांती सैनिक म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सेवेत पाठवतो. वीरमरण आलेले दोघे भारत सरकारने केलेल्या आंतरराष्ट्रीय करारांतर्गत शांतीसैनिक म्हणून काँगोत कार्यरत होते. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची नियुक्ती केली होती.

आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्यांनी आंदोलनाच्या नावाखाली शांतीसेनेवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीयांसह तीन शांतीसैनिकांना वीरमरण आले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि बीएसएफने माहिती मिळताच शोक व्यक्त केला. भारत सरकारने काँगोतील घटनेची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

गोमा नावाच्या शहरातही शांतीसैन्याविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडे आधुनिक शस्त्र आहेत. आंदोलनाच्या नावाखील सुरू असलेल्या हिंसेमुळे काँगोत नागरिकांचे रक्षण करणे शांतीसैन्यासाठी कठीण झाले आहे. 

बहुसंख्य नागरिकांचा शांतीसैन्याला पाठिंबा आहे. मात्र काही गट विशिष्ट हेतूसाठी शांतीसैन्याविरोधात हिंसक आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे काँगोच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हिंसक आंदोलन सुरू असलेल्या भागांमध्ये सामान्यांसाठी रस्त्यांवर वावरणे कठीण झाले आहे. आंदोलक करत असलेल्या हिंसेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

संयुक्त राष्ट्रे जगातील १४ देशांमध्ये शांतीसैन्यामार्फत नागरिकांच्या रक्षणाचे काम करतात. यापैकी आठ देशांमध्ये भारताचे शांतीसैनिक कार्यरत आहेत. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसैन्यात ५४०० शांतीसैनिक कार्यरत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांनी खबरदारीचा उपाय म्हणून कसाई सेंट्रल आणि तंजांकिया येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसैन्याची कार्यालये बंद केली असू तिथले सैनिक इतर तळांवर स्थलांतरित केले आहेत. शांती सैनिक आणि एम २३ नावाचा काँगोत हिंसा करणारा गट यांच्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आता आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांत शांती सैन्यावर झालेल्या हिंसक हल्ल्यांमध्ये पाच शांतीसैनिकांना वीरमरण आले तर ५० जण जखमी झाले आहेत.  वीरमरण आलेल्यांमध्ये दोन भारतीय शांतीसैनिक आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी