Video : रेल्वेच्या नव्या AC कोचची ताशी १८० वेगाची चाचणी यशस्वी

Indian Railways completed speed trials of new AC 2 tier LHB coach : भारतीय रेल्वेने (Indian Railways) नव्या एसी-२ टिअर एलएचबी कोचची (AC-2 tier LHB coach) ताशी १८० वेगाची यशस्वी चाचणी घेतली.

Indian Railways completed speed trials of new AC 2 tier LHB coach
Video : रेल्वेच्या नव्या AC कोचची ताशी १८० वेगाची चाचणी यशस्वी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Video : रेल्वेच्या नव्या AC कोचची ताशी १८० वेगाची चाचणी यशस्वी
  • चाचणी नागदा - कोटा - सवाई माधोपुर सेक्शनमध्ये
  • व्हिडीओ ट्वीट करून चाचणीची माहिती दिली

Indian Railways completed speed trials of new AC 2 tier LHB coach : भारतीय रेल्वेने (Indian Railways) नव्या एसी-२ टिअर एलएचबी कोचची (AC-2 tier LHB coach) ताशी १८० वेगाची यशस्वी चाचणी घेतली. चाचणी नागदा - कोटा - सवाई माधोपुर सेक्शनमध्ये झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaisnaw) आणि रेल्वे मंत्रालय यांनी व्हिडीओ ट्वीट करून चाचणीची माहिती दिली. व्हिडीओत दिसणारे स्पीडोमीटर ताशी १८० किमी वेग हा स्पष्ट दाखवत आहे.

पश्चिम मध्य रेल्वे प्रशासनाने नव्या कोचच्या ६० पेक्षा जास्त चाचण्या घेतल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पालन रेल्वेच्या नव्या कोचमध्ये होत आहे की नाही याची खात्री करून घेण्यात आली. 

रेल्वेच्या नव्या कोचच्या चाचण्या आरडीएसओने (Research Design and Standards Organisation - RDSO) केल्या. लवकरच दिल्ली-वाराणसी व्हाया कानपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये (Vande Bharat Train or Vande Bharat Express) नव्या डिझाइनच्या कोचचा वापर सुरू होईल. यामुळे कोणत्याही कारणाने गाडी अचानक थांबवली तरी प्रवाशांना धक्का लागत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी