Vande Bharat: वंदे भारत ट्रेनमध्ये लागणार FRPच्या या खास सीट्स, विंडोसीटचा सर्व प्रवाशांना घेता येणार आनंद

आधूनिक ट्रेन वंदे भारत लवकरच नव्या लूकमध्ये दिसणार आहे. या ट्रेनमध्ये FRPच्या खास सीट्स लावल्या जाणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना विंडोसीटचा आनंद घेता येणार आहे. टाटा स्टील कंपनी या सीट्सचा पुरवठा करणार आहे. देशातली ही पहिल्याच प्रकारची सीटव्यवस्था असणार आहे. 

vande bharat
वंदे भारत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आधूनिक ट्रेन वंदे भारत लवकरच नव्या लूकमध्ये दिसणार आहे.
  • या ट्रेनमध्ये FRPच्या खास सीट्स लावल्या जाणार आहेत
  • ज्यामुळे प्रवाशांना विंडोसीटचा आनंद घेता येणार आहे.

Indian Railways IRCTC's Vande Bharat Train: नवी दिल्ली : आधूनिक ट्रेन वंदे भारत (Vande Bharat Train) लवकरच नव्या लूकमध्ये दिसणार आहे. या ट्रेनमध्ये FRPच्या खास सीट्स लावल्या जाणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना विंडोसीटचा आनंद घेतणार आहे. टाटा स्टील कंपनी (Tata Steel Company) या सीट्सचा पुरवठा करणार आहे. देशातली ही पहिल्याच प्रकारची सीटव्यवस्था असणार आहे. ( Indian Railways IRCTC: Vande Bharat Train to get special seats tata steel get contract news in marathi)

अधिक वाचा : Indian Railway: खूशखबर, या खास गोष्टीमुळे वंदे भारतचा प्रवास होणार अधिक आरामदायक

टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देवाशीष भट्टाचार्य यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भट्टाचार्य म्हणाले की, कंपनीला २२ ट्रेन्संना अशा प्रकारच्या सीट्स पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटाचे मुल्य एकूण १४५ कोटी रुपये इतके आहे. वंदे भारत ट्रेनसाठी या सीट्सची डिझाईन केल्याचे त्यांनी सांगितले. ही सीट १८० अंशापर्यंत फिरते. तसेच या सीटमध्ये विमानांच्या सीट्सप्रमाणे सुविधा देण्यात आल्या आहेत. भारतात अशाप्रकारे पहिल्यांदाच सीट बनवल्या जात आहेत. सप्टेंबरपासून या सीट्सचा पुरवठा सुरू होणार असून पुढील १२ महिन्यात या ऑर्डरची पुर्तता करण्यात येईल असेही भट्टाचार्य म्हणाले. 

अधिक वाचा : Rail Budget 2022:  3 वर्षांत 400 वंदे भारत ट्रेनची निर्मिती  100 कार्गो टर्मिनल बांधण्याची योजना

वंदे भारत ट्रेनसाठी बनवलेल्या या सीट्स फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर (FRP) पासून बनवण्यात आली आहे. या सीट्सचे वैशिष्ट्य असे की या सीट्सला फार मेन्टेन करावे लागत नाही. या सीटमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. वंदे भारत ही ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावते, ही ट्रेन भारतातील सर्वाधिक वेगवान ट्रेन्सपैकी एक आहे. 

अधिक वाचा : २०० वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी टेंडर प्रक्रिया सुरू

भट्टाचार्य यांनी सांगितले की टाटा स्टीलने रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी २०२५-२६ पर्यंत ३ हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. टाटा स्टील सॅण्डविच पॅनल बनवण्यासाठी खोपोलीत एक कारखाना उभारणार आहे. त्यासाठी नेदरलँडच्या एका कंपनीसोबत करारही झाला आहे. या कारखान्यात तयार झालेले सॅण्डविच पॅनल रेल्वे आणि मेट्रोच्या कोचमध्ये वापरण्यात येतील.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी