Indian Railways भारतीय रेल्वे फेब्रुवारी २०२२ पर्यंत रद्द करणार 'या' गाड्या

Indian Railways Plans to Cancel 6 Pairs of Trains From December 2021 to February 2022 भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत धावणार असलेल्या सहा जोडी गाड्या रद्द करणार आहे

Indian Railways Plans to Cancel 6 Pairs of Trains From December 2021 to February 2022
भारतीय रेल्वे फेब्रुवारी २०२२ पर्यंत रद्द करणार 'या' गाड्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • भारतीय रेल्वे फेब्रुवारी २०२२ पर्यंत रद्द करणार 'या' गाड्या
 • सहा जोडी गाड्या रद्द करणार
 • थंडीच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देत घेतला निर्णय

Indian Railways Plans to Cancel 6 Pairs of Trains From December 2021 to February 2022 । नवी दिल्ली: भारतीय रेल्वे १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत धावणार असलेल्या सहा जोडी गाड्या रद्द करणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने थंडीच्या दिवसांत निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात दरम्यान सहा जोडी गाड्या रद्द करणार असल्याचे जाहीर केले. तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. पश्चिम रेल्वेने १ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वांद्रे, अहमदाबाद, वलसाड, उज्जैन येथून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या बारा गाड्या रद्द केल्या आहेत. 

 1. 05068 वांद्रे टर्मिनस - गोखपूर साप्ताहिक विशेष ३ डिसेंबर २०२१ ते २५ फेब्रुवारी २०२२ दर शुक्रवार - रद्द
 2. 05067 गोरखपूर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष १ डिसेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ दर बुधवार - रद्द
 3. 09017 वांद्रे टर्मिनस - हरिद्वार साप्ताहिक विशेष १ डिसेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ - रद्द
 4. 09018 हरिद्वार - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष २ डिसेंबर २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२२ दर गुरुवार - रद्द
 5. 09403 अहमदाबाद - सुलतानपूर साप्ताहिक विशेष ७ डिसेंबर २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दर मंगळवार - रद्द
 6. 09404 सुलतानपूर - अहमदाबाद साप्ताहिक विशेष ८ डिसेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ दर बुधवार - रद्द
 7. 09407 अहमदाबाद - वाराणसी साप्ताहिक विशेष २ डिसेंबर २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२२ दर गुरुवार - रद्द
 8. 09408 वाराणसी - अहमदाबाद साप्ताहिक विशेष ४ डिसेंबर २०२१ ते २६ फेब्रुवारी २०२२ दर शनिवार - रद्द
 9. 09111 वलसाड - हरिद्वार साप्ताहिक विशेष ७ डिसेंबर २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२२ दर मंगळवार - रद्द
 10. 09112 हरिद्वार - वलसाड साप्ताहिक विशेष ८ डिसेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ दर बुधवार - रद्द
 11. 04309 उज्जैन - डेहराडून साप्ताहिक विशेष २ डिसेंबर २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२२ दर बुधवार आणि गुरुवार - रद्द
 12. 04310 डेहराडून - उज्जैन साप्ताहिक विशेष १ डिसेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ दर मंगळवार आणि बुधवार - रद्द

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी