ब्रेकिंग: १२ मे पासून सुरू होणार पॅसेंजर ट्रेन्स

लॉकडाऊन सुरू असताना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, भारतीय रेल्वेने आपल्या पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Indian Railway
फाईल फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • १२ मे पासून सुरू होणार पॅसेंजर ट्रेन्स
  • ११ मे पासून सुरू होणार ट्रेनचं बुकिंग

नवी दिल्ली: लॉकडाऊन सुरू असताना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, भारतीय रेल्वेने आपल्या पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, १२ मे पासून पॅसेंजर ट्रेन्स हळुहळू सुरू करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी बुकिंग ११ मे रोजी संधयाकाळी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तिकिट बुकंगसाठी नागरिकांनी IRCTCच्या वेबसाईटवर लॉगइन करावे.

सुरुवातीला रेल्वेकडून (अप आणि डाऊन मिळून) ३० ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेतून प्रवास करताना प्रवासांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणं बंधनकारक असल्याचंही रेल्वेने म्हटलं आहे. यासोबतच रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांचं स्क्रिनिंग होईल आणि त्यानंतरच त्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. जर  प्रवाशांमध्ये संक्रमणाचे लक्षण जाणवले नाही तरच त्यांना प्रवास करता येणार आहे.

रेल्वे सुरुवातीला १५ ट्रेन्स दिल्लीतून सुरू करणार आहे. या ट्रेन्स दिल्लीतून पाटणा, मुंबई, अहमदाबाद, रांची, बिलासपूर, भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, सिकंदराबाद, बंगळुरू, मडगांव या स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. 

रेल्वे स्थानकांमधील तिकिच बुकिंग खिडकी बंद राहणार आहे. प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकिट बुकिंग करावे. तसेच प्लॅटफॉर्म तिकिटासाठीही काऊंटर सुरु करण्यात येणार नाहीये. त्यामुळे नागरिकांनी तिकिटासाठी रेल्वे स्थानकांकडे धाव घेण्याची गरज नाहीये.

संपूर्ण देशभरात २५ मार्च पासून लॉकडाऊनमुळे सर्व ट्रेन्स बंद आहेत. त्यामुळे स्थलांतरित मजुरांचे मोठे हाल झाले. त्यानंतर या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी खास श्रमिक स्पेशल ट्रेन्स रेल्वेने सुरू केल्या. त्यानंतर आता पॅसेंजर ट्रेन्स हळुहळू सुरू करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी एक चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी