indian railways : एसी 3 टियर इकॉनॉमी चा प्रवास स्वस्त, भारतीय रेल्वेने तिकीट दर केले कमी, चादर आणि ब्लँकेट ची सेवा पूर्वीसारखीच चालू राहणार

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 23, 2023 | 20:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Railway Reduce ticket fare : रेल्वेने 22 मार्च पासून जुने स्वरूप पुन्हा लागू करत एसी-3 टियर इकॉनॉमी क्लासचे वाढलेले दर आता कमी केले आहेत. आता एसी-3 टियर च्या तुलनेत इकॉनॉमी क्लाससाठी प्रवाश्यांना 60-70 रुपये कमी मोजावे लागणार आहेत.  

रेल्वेने  एसी-3 टियर इकॉनॉमी क्लासचे तिकीट दर केले कमी
आता एसी-3 टियर च्या तुलनेत इकॉनॉमी क्लाससाठी प्रवाश्यांना 60-70 रुपये कमी मोजावे लागणार आहेत.   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • रेल्वेने एसी-3 टियर इकॉनॉमी क्लासचे तिकीट दर केले कमी
  • 22 मार्च नंतरच्या एडव्हान्स बुकिंगचे पैसे नव्या दरानुसार रिफंड मिळणार
  • AC-3 इकॉनॉमी कोच म्हणजे काय? 

Indian Railway रेल्वेने सप्टेंबर 2021 मध्ये स्वस्त AC प्रवास सेवा देण्यासाठी AC-3 इकॉनॉमी कोच ची सुरुवात केली होती. मात्र नोव्हेंबर 2022 मध्ये AC-3tier इकॉनॉमी आणि AC-3tier च्या विलीनिकरणामुळे दोन्ही वर्गाचे भाडे समान झाले. 

जुन्या दरात तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाश्यांना केले जाणार रिफंड

रेल्वेच्या आदेशानुसार ज्या प्रवाश्यांनी 22 मार्च नंतरच्या तारखेसाठी आधीच ऑनलाइन तिकीट बुक केली आहेत, त्यांना नवीन दरानुसार पैसे परत केले जातील. तसेच ज्या प्रवाश्यांनी तिकीट काउंटरद्वारे ऑफलाईन तिकीट बुक केले आहेत, त्यांना उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी आपल्या तिकीटांसह बुकिंग काउंटरवर जावे लागेल. 

हे पण वाचा : ​स्वामी साकारणाऱ्या अक्षय यांच्याबद्दल काही खास गोष्टी

इकॉनॉमी कोचमध्ये चादर- ब्लँकेटच्या सेवेत बदल नाही 

जेव्हा  AC-3 इकॉनॉमी कोच सुरू केला होता तेव्हा रेल्वेद्वारे प्रवाश्यांना चादर- ब्लँकेट दिले जात नव्हते, AC-3 मध्ये विलीन केल्यानंतर तिकीट दर समान करण्यात आले. त्यामुळे AC-3 इकॉनॉमी कोच मध्ये चादर आणि ब्लँकेट ची सेवा सुरू करण्यात आली होती. आता रेल्वेने जुनी पद्धत पुन्हा लागू केली असली तरी चादर आणि ब्लँकेट देण्याची सेवा मागे घेण्यात आलेली नाही.  

इकॉनॉमी कोचमध्ये सिटची रुंदी कमी 

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते सामान्य एसी कोचमध्ये 72 सीट्स असतात. मात्र AC-3 इकॉनॉमी कोचमध्ये 80 सीट्स असतात. याचे कारण म्हणजे, AC इकॉनॉमी कोचमधील सीट्स ची ररुंदी सामान्य थर्ड AC कोचच्या तुलनेत थोडी कमी असते. 

हे पण वाचा : कडक उन्हातही या फेस पॅकमुळे त्वचा चमकेल

AC-3 इकॉनॉमी कोच म्हणजे काय? 

लखनौ येथील रेल्वे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने (RDSO)एसी-3 इकॉनॉमी क्लासच्या डब्यांची व्यवस्था केली होती. स्लिपर क्लासचे ची ही आधुनिक व्यवस्था असून एसी-3 इकॉनॉमी कोच स्लिपर कोचपेक्षा अधिक आरामदायी आणि सुविधापूरक आहे. डब्यांची रचना केली होती.           
      
अहमदाबादने देशातील लोकांच्या प्रवासाच्या सवयींवर संशोधन करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) हे पुस्तक तयार केले होते. या पुस्तकामध्ये रेल्वे प्रवाश्यांच्या गरजा नमूद केल्या आहेत. या पुस्तकांमधील माहितीचा आढावा घेत नव्या कोचची रचना करण्यात आली आहे. जुन्या स्लिपर कोचच्या तूलनेत नव्या कोचची मांडणी खूपच वेगळी आहे. शिवाय या कोचची फिनिशिंग देखील खूप अलिशान आहे.  

हे पण वाचा : ​ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

एसी-3 इकॉनॉमी कोचचे वैशिष्ट्य

  • एसी 3 इकॉनॉमी कोचमध्ये एसी नियंत्रण नाही. 
  • शौचालय व्यतिरिक्त संपूर्ण कोचमध्ये सीट आहे.
  • 160 km/h च्या वेगात धावू शकते.
  • अभ्रक आणि फायबरपासून संपूर्ण कोच ची फिनिशिंग केली आहे. 
  • एडवांस संस्पेन्शन सिस्टम लावल्यामुळे चालत्या गाडीत प्रवाश्यांना धक्के किंवा हादरे बसणार नाही.      

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी