भारतीय ब्लॉगरचा मेक्सिकोतील गोळीबारात मृत्यू

मूळची भारतातील हिमाचल प्रदेशची ट्रॅव्हल ब्लॉगर असलेली अंजली रियोत हिचा उत्तर मेक्सिकोतील तुलुम रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला. अंजली २९ वर्षांची होती. गोळीबारात जर्मनीच्या एका पर्यटकाचाही मृत्यू झाला.

Indian travel blogger killed in Mexico
भारतीय ब्लॉगरचा मेक्सिकोतील गोळीबारात मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • भारतीय ब्लॉगरचा मेक्सिकोतील गोळीबारात मृत्यू
  • गोळीबारात जर्मनीच्या एका पर्यटकाचाही मृत्यू
  • रिसॉर्टमध्ये टोळीयुद्ध (गँगवॉर)

मेक्सिको सिटी: मूळची भारतातील हिमाचल प्रदेशची ट्रॅव्हल ब्लॉगर असलेली अंजली रियोत हिचा उत्तर मेक्सिकोतील तुलुम रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला. अंजली २९ वर्षांची होती. गोळीबारात जर्मनीच्या एका पर्यटकाचाही मृत्यू झाला.

उत्तर मेक्सिकोत समुद्र किनाऱ्याजवळ कॅरेबियन संस्कृतीशी संबंधित तुलुम नावाचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये अंमली (ड्रग/ड्रग्स) पदार्थांच्या तस्करीशी संबंधित दोन टोळ्यांमध्ये बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री गोळीबार झाला. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अंजली रियोत आणि जर्मनीतून आलेल्या एका पर्यटकासह इतर दोन जणांचा समावेश आहे.

अंजली तिच्या पतीसह (उत्कर्ष श्रीवास्तव) रिसॉर्टमध्ये काही दिवस राहण्याच्या उद्देशाने आली होती. अंजलीचा वाढदिवस शुक्रवार २२ ऑक्टोबर रोजी होता. हा वाढदिवस साजरा करायचा आणि काही दिवस निवांत राहायचे या उद्देशाने अंजली सोमवार १८ ऑक्टोबर २०२१ पासून रिसॉर्टवर आली होती. 

आयटी क्षेत्रात काम करणारी अंजली पतीसोबत अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतातील सॅन जोन्स शहरात राहत होती. ती काही दिवस निवांत राहण्यासाठी पतीसोबत रिसॉर्टवर आली होती. गोळीबार झाला त्यावेळी रिसॉर्टवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकांची पळापळ झाली. पळापळ सुरू असतानाच गोळी लागली आणि अंजलीचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी