कुलभूषण जाधव खटल्यात पाकिस्तानचं खोटं जगासमोर आलं: हरीश साळवे

Harish Salve on Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव खटल्यात आयसीजेने दिलेल्या निकालानंतर या खटल्यात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 

harish-salve
कुलभूषण जाधव खटल्यात पाकिस्तानचं खोटं जगासमोर आलं: हरीश साळवे  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वकिल हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्या खटल्याबाबतीत देण्यात आलेल्या निकालाबाबत माहिती दिली. 
  • कुलभूषण जाधव खटल्यात भारताचा मोठा विजय
  • आयसीजेने दिलेल्या निकालाचं वकील हरीश साळवेंनी केलं स्वागत

नवी दिल्ली: Harish Salve on Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात भारताला मोठा विजय मिळाला आहे. कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहेत. तसेच या शिक्षेवर पुर्नविचार करण्याचा आदेश देखील दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली ती सुप्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी. आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिलेल्या निकालानंतर साळवे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या खटल्यासंबंधी देण्यात आलेल्या निकालाबाबत माहिती दिली. कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासंबंधी कोर्टाने जो निर्णय दिला त्याचं हरीश साळवे यांनी स्वागत केंल आहे. याबाबत साळवे असं म्हणाले की, ते आयसीजेच्या निर्णयामुळे खूप प्रसन्न आहेत. हा निकाल जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना न्याय मिळाला आहे. 

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पत्रकारांशी बोलताना साळवे म्हणाले की, 'निकालात असं म्हटलं आहे की, जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर प्रभावीपणे पुन्हा विचार केला गेला पाहिजे.' पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन झालं आहे. असं साळवे यावेळी म्हणाले.  

'एक वकील म्हणून मी खूप समाधानी आहे. या निर्णयामुळे मला खूपच दिलासा मिळाला आहे. यामुळे पाकिस्तानचं खोटं जगासमोर आलं आहे. कोर्टाने स्पष्ट केलं आहे की, फाशी देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी खूप खुश आहे. आता भारताचं पुढचं पाऊल हे असणार आहे की, जाधव यांच्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये निष्पक्ष सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळायला हवा.' असं म्हणत साळवे यांनी आयसीजेचा निकाल हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं. 

दुसरीकडे पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत भारताचा मोठा राजकीय विजय आणि पाकिस्तानचा तेवढाच मोठा पराभव झाला आहे. नेदरलंडच्या हेगमधील आंतराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताने याचिकेत जे मुद्दे उपस्थित केले होते त्यापैकी जवळपास सर्वच मुद्द्यांना योग्य ठरवण्यात आलं. 

आयसीजेने याप्रकरणी पाकिस्तानला फटकारलं आहे. कोर्टाने यावेळी असं म्हटलं की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना त्याचे अधिकारी देऊ केले नाहीत. असं करणं हे हिएन्ना कराराचं उल्लंघन आहे. यावेळी कोर्टाने स्पष्ट केलं की, भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची समीक्षा करावी. याचाच अर्थ जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर कोर्टाने स्थगिती आणली आहे. या निर्णयामुळे भारतीय उचायुक्तातील अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेऊ शकतात. तसेच त्यांना वकील आणि इतर कायदेशीर सुविधा पुरवू शकतात. 

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने भारतीय गुप्तहेर म्हणून फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानचा असा आरोप आहे की, दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. तर भारताने पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळून आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली होती. आता याच प्रकरणी आयसीजेने देखील भारताच्याच बाजूने निकाल दिला आहे. 

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमध्ये सध्या शिक्षा भोगत आहेत. पाकिस्तानने ३ मार्च २०१६ मध्ये जाधव यांना इराणमधून अटक केली होती. तर एप्रिल २०१७ मध्ये एका लष्करी कोर्टात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचप्रकरणी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना दिलासा देणारा निकाल दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कुलभूषण जाधव खटल्यात पाकिस्तानचं खोटं जगासमोर आलं: हरीश साळवे Description: Harish Salve on Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव खटल्यात आयसीजेने दिलेल्या निकालानंतर या खटल्यात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...