भारताचा मोठा निर्णय, 'या' देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध

India's big decision, strict restrictions on travelers coming from 'these' countries कोरोना विषाणूच्या नव्या वेगाने संसर्ग पसरविणाऱ्या अवताराची माहिती मिळताच भारत सरकार सावध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय झाला आहे.

strict restrictions on travelers coming from 'these' countries
भारताचा मोठा निर्णय, 'या' देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध 
थोडं पण कामाचं
  • भारताचा मोठा निर्णय, 'या' देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध
  • द.आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग, युनायटेड किंगडम आणि युरोपचे देश
  • ओम्रिकॉन' (तांत्रिक नाव - VOC B.1.1529) नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय

India's big decision, strict restrictions on travelers coming from 'these' countries नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या नव्या वेगाने संसर्ग पसरविणाऱ्या अवताराची माहिती मिळताच भारत सरकार सावध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार निवडक देशांची यादी तयार केली आहे. या यादीतील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लागू होतील.

यादीत समावेश असलेल्या देशांतून येणाऱ्यांची कोरोना चाचणी होईल तसेच संबंधित देशांच्या प्रवाशांना कोरोना बाधीत असो वा नसो ठाराविक कालावधीसाठी क्वारंटाइन केले जाईल. कोरोनाबाधीत नसल्यास क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर जाण्याची परवानगी मिळेल. पण विशिष्ट कोविड प्रोटोकॉलचे पालन बंधनकारक राहील. नागरिक ज्या शहरात वा जिल्ह्यात मुक्कामास असतील तिथले प्रशासन त्यांच्या संपर्कात राहणार आहे.

भारत सरकारने ज्या देशांमधून येणाऱ्यांवर कडक निर्बंध लागू केले आहेत त्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग, युनायटेड किंगडम आणि युरोपच्या देशांचा समावेश आहे.

ओम्रिकॉन' (तांत्रिक नाव - VOC B.1.1529) नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाला आहे. हा विषाणू सर्वाधिक वेगाने मानवी शरीर आजाराने बाधीत करतो. या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू शकतो. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक कोरोना प्रतिबंक लस या विषाणूला प्रतिबंध करण्यात अपयशी ठरत असल्याचे आढळले आहे. अद्याप भारतात हा विषाणू आढळलेला नाही. भारतीय कोरोना प्रतिबंधक लसचा 'ओम्रिकॉन'ला प्रतिबंध करण्यासाठी उपयोग होतो की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही. तज्ज्ञ आवश्यक त्या तपासण्या करत आहेत. पण भारत सरकारने खबरदारी म्हणून विदेशातून येणाऱ्यांवर निर्बंध लागू करण्याची तयारी केली आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी यंत्रणेला लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांनी लसचा पहिला डोस घेतला पण मुदत उलटली तरी दुसरा डोस घेतलेला नाही अशांना शोधून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी