भारतात टोचले ९७.६५ कोटींपेक्षा जास्त कोरोना लसचे डोस

भारतात ९७.६५ कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

India's cumulative COVID-19 vaccination coverage exceeds 97.65 cr
भारतात टोचले ९७.६५ कोटींपेक्षा जास्त कोरोना लसचे डोस 
थोडं पण कामाचं
  • भारतात ९७ कोटी ६५ लाख ८९ हजार ५४० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले
  • भारताचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९८.१० टक्के
  • राज्यातील सर्व पात्र नागरिकांना लसचा पहिला डोस देण्याची मोहीम पूर्ण करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य

नवी दिल्ली: भारतात ९७.६५ कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. India's cumulative COVID-19 vaccination coverage exceeds 97.65 cr

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आज 22 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट

देशात मागील २४ तासांमध्ये ४१ लाख २० हजार ७७२ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. आतापर्यंत देशात ९७ कोटी ६५ लाख ८९ हजार ५४० कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. मागील २४ तासांत देशात १४ हजार १४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच मागील २४ तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांपैकी १९ हजार ७८८ जण बरे झाले. यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ एवढी झाली. भारताचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ९८.१० टक्के आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंतचा हा देशाचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे.

उत्तराखंडची उत्तुंग कामगिरी

राज्यातील सर्व पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्याची मोहीम पूर्ण करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य झाले. भारतात १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयाची प्रत्येक व्यक्ती ही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र आहे. देशात १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये सर्व पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. राज्यातील सर्व पात्र नागरिकांना लसचा दुसरा डोस देण्याची मोहीम प्रगतीपथावर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लसीकरणाच्या बाबतीत केलेल्या उत्तम कामगिरीसाठी उत्तराखंडचे अभिनंदन करणारे ट्वीट केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी