पाहा PHOTOS : वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी केले दुसरे लग्न, ब्रिटीश मैत्रिणीशी केला विवाह

ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी दुसरे लग्न केले आहे. त्यांनी आपल्या ब्रिटीश मैत्रिणीशी लंडनमधील एका चर्चमध्ये लग्नगाठ बांधली

harish salve
वकील हरिश साळवे यांनी ब्रिटीश मैत्रिणीशी केले दुसरे लग्न 

थोडं पण कामाचं

  • माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी दुसरा विवाह केला
  • ब्रिटीश मैत्रीण कॅरोलिनसोबत ते लंडनच्या चर्चमध्ये विवाहबद्ध झाले. 
  • या लग्नसोहळ्यास केवळ १५ लोक उपस्थित होते

मुंबई: माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील हरिश साळवे(harish salve) यांची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. वकील हरिश साळवे यांनी दुसरे लग्न(second marriage) केले आहे. ६५ वर्षीय हरिश साळवे यांनी आपली ब्रिटीश मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसर्ड (caroline brossard) हिच्याशी लंडनमधील चर्चमध्ये विवाह केला. 

हरिश यांच्या प्रमाणेच कॅरोलिनचाही हा दुसरा विवाह आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन ब्रिटीश कलाकार आहे आणि तिला एक मुलगीही आहे. 

Harish Salve wedding

साळवे यांनी या वर्षाच्या सुरूवातीला ३८ वर्षांपर्यंत जोडीदार राहिलेल्या मीनाक्षी साळवे यांच्याकडून घटस्फोट घेतला. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे नाव साक्षी आणि लहान मुलीचे नाव सानिया आहे. 

Harish Salve wedding

हरिश साळवे यांचे लग्न लंडनमधील एका चर्चमध्ये पार पडले.लग्नाच्या या छोटेखानी समारंभात केवळ १५ लोक सामील होते. यात दोनही कुटुंबातील लोक आणि काही खास मित्रपरिवार होता. कॅरोलिन एक आर्टिस्ट आहेत. हरिश साळवे यांची कॅरोलिनशी भेट एका आर्ट इव्हेंटदरम्यान झाली होती. साळवे नॉर्थ लंडनमध्ये राहतात. एका वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत आहेत. 

Harish Salve wedding

प्रोफेशनने आर्टिस्ट असलेल्या कॅरोलिन या युकेमध्ये वाढल्या आहेत. त्यांना १८ वर्षाची मुलगीही आहे. 

केवळ एक रूपये फी

कुलभूषण जाधव प्रकरणात हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडत आहेत. या केसमुळे हरिश साळवे चर्चेत आले होते. हरिश साळवे एका केससाठी लाखो रूपये फी घेतात. मात्र कुलभूषण जाधव प्रकरणात त्यांनी भारत सरकारकडून केवळ एक रूपया इतकी फी घेतली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने वकिलांवर करोडो रूपये खर्च केले आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी