भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात २५ पटीने वाढली

India's oil imports from Russia increased by 25 times​ : मागील काही महिन्यांपासून भारताने रशियाकडून होणारी तेलाच्या आयातीत टप्प्याटप्प्याने वाढ करायला सुरुवात केली आहे. आता भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात २५ पटीने वाढली आहे.

India's oil imports from Russia increased by 25 times
भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात २५ पटीने वाढली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात २५ पटीने वाढली
  • भारताने रशियाकडून होणारी तेलाच्या आयातीत टप्प्याटप्प्याने वाढ करायला सुरुवात केली
  • जून २०२२ मध्ये भारताने रशियाकडून १० लाख बॅरल तेलाची आयात केली

India's oil imports from Russia increased by 25 times​ : नवी दिल्ली : भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात २५ पटीने वाढली आहे. भारत रशिया, इराण, आखाती देश आणि अमेरिका या सर्वांकडून वेगवेगळ्या प्रमाणात तेलाची आयात करतो. पण मागील काही महिन्यांपासून भारताने रशियाकडून होणारी तेलाच्या आयातीत टप्प्याटप्प्याने वाढ करायला सुरुवात केली आहे. आता भारताची रशियाकडून होणारी तेलाची आयात २५ पटीने वाढली आहे. 

रशिया आणि युक्रेन यांच्यात लढाई सुरू झाल्यानंतर अमेरिका तसेच नाटो देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध असूनही काही देश रशियाकडून तेलाची आयात करत आहे. ही आयात करणाऱ्यांमध्ये भारत आणि चीन हे दोन प्रमुख देश आहेत. भारत रशियातून आयात केलेले तेल शुद्ध करून युरोपियन युनियनमधील देशांना चढ्या निर्यात करत आहे. या व्यवहारातून मिळणाऱ्या पैशांमुळे भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ होऊ लागली आहे. देशातील मोठ्या विकास योजनांसाठी निधी उपलब्ध करणे सोपे झाले आहे. यामुळेच भारताने रशियातून तेलाची आयात वाढविली तरी ते तेल शुद्ध स्वरुपात देशात विकण्याऐवजी परदेशी निर्यात करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे तेलाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे पाश्चात्यांचे निर्बंध असूनही रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला नाही.

रशियातून भारत, तुर्कस्तान आणि चीनमध्ये होणाऱ्या तेलाच्या आयातीत वाढ झाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार युक्रेन युद्ध सुरू होण्याआधी फेब्रुवारी २०२२ पर्यंत भारत रशियाकडून दरमहा ३० हजार बॅरल तेल खरेदी करत होता. पण जून २०२२ मध्ये भारताने रशियाकडून १० लाख बॅरल तेलाची आयात केली. युरोपच्या एकूण मागणीच्या एक चतुर्थांश तेल भारताने जून महिन्यात रशियाकडून आयात केली आहे. याआधी युरोपियन युनियनने रशियाकडून होणारी तेलाची आयात टप्प्याटप्प्याने ९० टक्के कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर युरोपियन युनियनने भारताकडून वाजवी दरात तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे.

रशियासोबतचा सर्व प्रकारचा व्यापार कमी करावा यासाठी पाश्चात्य देशांनी सुरुवातीला भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण या दबावाला झुगारून भारताने रशियासोबतचा व्यापार सुरू ठेवला आणि वाढवला आहे. रशियातून घेतलेले तेल शुद्ध करून युरोपला विकण्याचा व्यवसाय भारत मोठ्या प्रमाणात करत आहे. हा व्यवसाय वाढत असतानाच ब्रिक्सची बैठक होत आहे. या बैठकीत गुरुवार २३ जून २०२२ रोजी ब्रिक्स नेत्यांची ऑनलाईन बैठक (व्हर्च्युअल मीटिंग) होत आहे. या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी