India's top ten engineering colleges : बारावी आणि जेईई अॅडव्हान्स या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतातील आयआयटीमध्ये प्रवेशाकरिता अर्ज करता येतो. जेईई अॅडव्हान्स उत्तीर्ण होण्यासाठी आधी जेईई मेन्स ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यंदा शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी जेईई मेन्स होणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या जास्तीत अडीच लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेला बसता येईल.
जेईई अॅडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या जास्तीत जास्त 1 लाख जणांनाच भारतातील आयआयटीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. इतरांना एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जातो. भारतातील टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यावर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता जास्त असते. यामुळे विद्यार्थी टॉप टेन कॉलेजांसाठी धडपडत असतात.
मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर
कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS