देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 11,933 वर

देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. देशात आज कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

India's Coronavirus positive cases
देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 11,933 वर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.
  • देशात आज कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे.
  • 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची घोषणा केली. त्यातच देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. देशात आज कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 118 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला.  तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले आहे. पहिला हॉटस्पॉट जिल्हे, दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.  

तर देशभरात 170 जिल्हे हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात अजूनही समूह संसर्गाने कोरोनाचा संसर्ग झालेला नाही ही बाब महत्त्वाची आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

20 एप्रिलपर्यंत देशातील प्रत्येक शहराची आणि जिल्ह्याची तपासणी केली जाईल. कुठल्या भागात आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत आणि तिथे कशा प्रकारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत हे बघितले जाईल. हे तपासण्यासाठी केंद्राकडून काही दिशानिर्देश जारी केले जातील, असं पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी केले आहेत.

राज्यात अवघ्या काही तासात सापडले 117 नवे रुग्ण

गेल्या अवघ्या 12 तासात राज्यात 117 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील रुग्णांचा आकडा हा 2801 एवढा झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे आतापर्यंत महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सकाळपासून 117 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 66 रुग्ण हे मुंबईत तर 44 रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. तर इतर ठिकाणी 7 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर 11 जणांचा मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी