Indo-China Dispute : भारत-चीन सीमेवर तणाव कायम; आज चर्चेची 16 वी फेरी, चुशूल-मोल्डो मीटिंग पॉइंटवर होणार चर्चा

भारत आणि चीन (India-China) यांच्यात सीमेवर तणाव कायम आहे. सध्या पूर्व लडाख (East Ladakh) जवळील एअर स्पेसमध्ये भारत आणि चीन (India and China) हवाई दलामध्ये तणावाचं वातावरण आहे. याचदरम्यान आज 17 जुलै रोजी भारत आणि चीनमध्ये चर्चेची 16 वी फेरी पार पडणार आहे.

Tensions remain on India-China border; 16th round of discussion today
भारत-चीन सीमेवर तणाव कायम; आज चर्चेची 16 वी फेरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आज 17 जुलै रोजी भारत आणि चीनमध्ये चर्चेची 16 वी फेरी पार पडणार आहे.
  • पूर्व लडाखला लागून असणाऱ्या LAC च्या पेट्रोलिंग पॉईंट क्रमांक 15 वरील तणाव कमी करणे. यावर चर्चा होणार आहे.
  • भारतीय हवाई दलाने पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC च्या हवाई क्षेत्रात हवाई गस्त वाढवली

Indo-China Talk : भारत आणि चीन (India-China) यांच्यात सीमेवर तणाव कायम आहे. सध्या पूर्व लडाख (East Ladakh) जवळील एअर स्पेसमध्ये भारत आणि चीन (India and China) हवाई दलामध्ये तणावाचं वातावरण आहे. याचदरम्यान आज 17 जुलै रोजी भारत आणि चीनमध्ये चर्चेची 16 वी फेरी पार पडणार आहे. LAC वरील तणाव कमी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. पूर्व लडाख येथील चुशूल-मोल्डो मीटिंग पॉइंटवर भारतीय सीमेमध्ये ही बैठक पार पडेल.

या बैठकीतील मुख्य मुद्दा म्हणजे पूर्व लडाखला लागून असणाऱ्या LAC च्या पेट्रोलिंग पॉईंट क्रमांक 15 वरील तणाव कमी करणे. या व्यतिरिक्त भारताकडून डेपसांग मैदान आणि डेमचोक यांसारख्या वादग्रस्त भागांबद्दल तोडगा काढण्याची चर्चा केली जाईल. 

चीनी सैन्याचा गेल्या महिन्यात मोठा हवाई सराव

भारतीय सैन्याचे लेह स्थित कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल अनिंदय यां बैठकीत सामील होतील. तर चीनच्या बाजूने दक्षिण तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे प्रमुख मेजर जनरल यांग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

Read Also : सिद्धूला तुरुंगात बनले कारकून तर दलेर मेहंदी झाले हिशोबनीस

भारताने नोंदवला निषेध 

गेल्या महिन्यात चीनी सैन्याने अक्साई भागात मोठा हवाई सराव केला आहे. यावेळी चीनची विमानं भारतीय क्षेत्राच्या अगदी जवळ पोहोचली होती. चीनच्या हवाई सरावावर भारतीय हवाई दलाने निषेध नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याबद्दल चीनकडे निषेधही नोंदवला होता. चिनी हवाई दलाच्या या हालचालींमुळे भारतीय हवाई दलाने पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC च्या हवाई क्षेत्रात हवाई गस्त वाढवली आहे. 

Read Also : बारावी पास उमेदवारांना नौदलात नोकरीची संधी, लवकर करा अर्ज

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी