Indonesia : असे काय झाले की इंडोनेशियाला देशाची राजधानीच बदलावी लागली

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 21, 2022 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indonesia Changed Capital | इंडोनेशियाच्या संसदेने देशाची राजधानी जकार्ताहून नुसंतारा येथे हलवण्याचा कायदा केला आहे. इंडोनेशियाचे नेते वर्षानुवर्षे जकार्ता येथून राजधानी हलवण्याचा प्रयत्न करत होते. पण इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून का हलवली जात आहे याबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

indonesia changed capital now nusantara is the new capital of the country
इंडोनेशियाने बदलली देशाची राजधानी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंडोनेशियाच्या संसदेने देशाची राजधानी जकार्ताहून नुसंतारा येथे हलवण्याचा कायदा केला आहे.
  • नुसंतारा शहराची देशाच्या राजधानीसाठी राष्ट्राध्यक्ष विडोडो यांनी निवड केली आहे.
  • २०५० पर्यंत जकार्ता पूर्णपणे पाण्याखाली जाईल असे अनेक अहवाल दाखवण्यात आले आहे.

Indonesia Changed Capital | नवी दिल्ली :  इंडोनेशियाच्या संसदेने देशाची राजधानी जकार्ताहून (Jakarta) नुसंतारा (Nusantara) येथे हलवण्याचा कायदा केला आहे. इंडोनेशियाचे नेते वर्षानुवर्षे जकार्ता येथून राजधानी हलवण्याचा प्रयत्न करत होते. पण इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून का हलवली जात आहे याबाबत सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो (Joko Widodo) यांनी प्रथम घोषणा केली की राजधानी जकार्ता येथून हलवली जाईल. परंतु कोरोना व्हायरसच्या कारणामुळे या कामाला विलंब झाला आहे. माहितीनुसार, २०२२ ते २०२४ दरम्यान राजधानीचे हस्तांतरण वर्तमान जागेवरून दुसरीकडे करण्यास सुरूवात होईल. जकार्ता स्वातंत्र्यापासून देशाची राष्ट्रीय राजधानी म्हणून राहिले आहे. जकार्ता एक गजबजलेले शहर होत चालले होते. गर्दीपासून प्रदूषणापर्यंत जकार्ताच्या समस्या खूप वाढत होत्या. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे जकार्ताला हवामान बदलामुळे बुडण्याचा धोका देखील होता. (indonesia changed capital now nusantara is the new capital of the country).   

 किती वेगाने बुडत आहे जकार्ता? 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालात असे म्हटले आहे की जकार्ता समुद्राजवळील दलदलीच्या जमिनीवर आहे. त्यामुळे ते सातत्याने पुराच्या विळख्यात येत आहे. अहवालानुसार, हे पृथ्वीवरील सर्वात वेगाने बुडणाऱ्या शहरांपैकी एक आहे. भूगर्भातील पाण्याचा अतिरेक झाल्यामुळे ते जावा समुद्रात धोक्याच्या वेगाने जात आहे. सुमारे एक कोटींचे हे शहर हळूहळू बुडत चालेल आहे. २०५० पर्यंत जकार्ता पूर्णपणे पाण्याखाली जाईल असे अनेक अहवाल दाखवण्यात आले आहे. 

अधिक वाचा : इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोसांचा पुतळा

नुसंतारा असणार नवीन राजधानी  

नुसंतारा शहराची देशाच्या राजधानीसाठी राष्ट्राध्यक्ष विडोडो यांनी निवड केली आहे. हा जावानीज शब्द आहे ज्याचा अर्थ इंडोनेशियन भाषेत 'बेट' असा होतो. हा भाग बोर्नियो बेटावरील कालीमंतनच्या जंगलात आहे. इंडोनेशियाच्या नॅशनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या आकडेवारीनुसार नवीन राजधानीसाठी एकूण जमीन सुमारे २,५६,१४३ हेक्टर असेल. इंडोनेशियाच्या मालकीचे कदाचित बोर्नियो जगातील तिसरे सर्वात मोठे बेट आहे. तर मलेशिया आणि ब्रुनेई प्रत्येकी उत्तरेकडील भाग आहेत. इंडोनेशियातील माध्यमांच्या माहितीनुसार, नवीन राजधानी सरकार कमी-कार्बन सुपर हब म्हणून तयार करेल जे फार्मास्युटिकल, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रांना समर्थन देणारे असेल. नुसंताराचे नेतृत्व एका मुख्य समितीकडे असेल ज्याचा दर्जा एका मंत्र्याच्या बरोबरीचा असेल.

राजधानी बदलण्याचा प्रकार नवीन नाही

मागील काही वर्षात काही देशांनी आपली राजधानी बदलली आहे. यामध्ये कझाकस्तान आणि म्यानमारने गेल्या काही वर्षांत त्यांची राजधानी बदलली आहे. १९९७ मध्ये कझाकस्तानने आपली राजधानी अल्माटीहून अस्ताना येथे हलवली. २०१९ मध्ये अस्तानाचे नूर-सुलतान असे नामकरण करण्यात आले. म्यानमारने २००५ मध्ये आपली राजधानी यंगूनहून नेपिडॉ या दुसर्‍या नियोजित शहरात हलवली होती. त्यामुळे राजधानी बदलण्याचा प्रकार नवीन नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी