Stampede: फुटबॉल मॅच ठरली जीवघेणी, दोन क्लबच्या समर्थकांमध्ये हिंसाचार; चेंगराचेंगरीत 127 जणांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Oct 02, 2022 | 08:21 IST

stampede at football match in Indonesia: फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर (violence) झालेल्या चेंगराचेंगरीत (stampede) किमान 127 लोक मृत्यू झाला आहे. तर 180 हून अधिक जणजखमी झाले आहेत.

football  Indonesia
फुटबॉल सामन्यादरम्यान दोन क्लबच्या समर्थकांमध्ये हिंसाचार, 129 जणांचा बळी 
थोडं पण कामाचं
  • अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात फुटबॉल सामना सुरू होता.
  • शनिवारी रात्री पूर्व जावामधील मलंग रिजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमवर इंडोनेशियन टॉप लीग BRI लीग-1 च्या फुटबॉल सामन्यादरम्यान ही घटना घडली.
  • संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानात घुसून मारामारी सुरू केली.

इंडोनेशिया: Stampede at football match in Indonesia: इंडोनेशियामध्ये (Indonesia)  फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर (violence) झालेल्या चेंगराचेंगरीत (stampede) किमान 127 लोक मृत्यू झाला आहे.  तर 180 हून अधिक जणजखमी झाले आहेत. रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. शनिवारी रात्री पूर्व जावामधील मलंग रिजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमवर इंडोनेशियन टॉप लीग BRI लीग-1 च्या फुटबॉल सामन्यादरम्यान ही घटना घडली.

पूर्व जावा प्रांताचे पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,  अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात फुटबॉल सामना सुरू होता. पराभूत टीम अरेमाच्या समर्थकांनी मैदानात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, त्यामुळे चेंगराचेंगरी आणि गुदमरल्याच्या घटना घडल्या.

अधिक वाचा-  Milind Narvekar: 'आता मिलिंद नार्वेकर...', दसऱ्याच्या आधी बसणार 'मातोश्री'ला मोठा हादरा?

संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानात घुसून मारामारी सुरू केली. सर्वत्र गोंधळ माजला होता. पूर्व जावा पोलिसांचे प्रमुख निको एफिंटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेत 34 जणांचा मैदानावरच मृत्यू झाला.उर्वरित 93 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.

फुटबॉल असोसिएशनने मागितली माफी 

इंडोनेशियाच्या फुटबॉल असोसिएशनने (PSSI) शनिवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि सांगितले की खेळानंतर काय घडले याचा तपास सुरू करण्यासाठी एक टीम मलंगला रवाना झाली आहे. 

"PSSI कंजुरुहान स्टेडियमवरील अरेमा समर्थकांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि पीडितांच्या कुटुंबियांची आणि घटनेत सहभागी असलेल्या सर्व पक्षांची माफी मागतो," असे निवेदनात म्हटले आहे. यासाठी पीएसआयने तातडीने तपास पथक तयार केले आणि ते तात्काळ मलंगकडे रवाना झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी