रुग्णालयात घुसून झोपलेल्या रुग्णाची निर्घृण हत्या

Man killed in Rajaji hospital in Madurai: मदुराईतील राजाजी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

inhumane murder of patient while sleeping in hospital in madurai 
रुग्णालयात घुसून झोपलेल्या रुग्णाची निर्घृण हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • रुग्णालयात घुसून रुग्णाची हत्या, मदुराईमधील धक्कादायक घटना
  • चार ते पाच अज्ञात मारेकऱ्यांनी केली हत्या
  • हल्लेखोर फरार, पोलिसांकडून तपास सुरु

चेन्नई: चेन्नईच्या मदुराईत एक अतिशय खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील राजाजी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची चार अज्ञात लोकांनी निर्घृण हत्या केली आहे. खुनाची ही घटना आज (सोमवार) सकाळी घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चार अज्ञात लोकांनी  रुग्णालयातील वॉर्डमध्ये घुसून झोपेत असलेल्या रुग्णाची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मुरुगन (वय ४० वर्ष) असे असल्याचे समजते आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४ ते ५ जण जबरदस्तीने रुग्णालयात घुसले. यानंतर ज्या ठिकाणी मुरुगन झोपला होता त्या वॉर्डमध्ये हे सर्व जण गेले आणि त्यांनी दरवाजा आतून बंद केला. यानंतर त्यांनी मुरुगनची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण प्रचंड घाबरले होते. पोलिसांना असा संशय आहे की, एखाद्या जुन्या वादातून ही हत्या झालेली असू शकते. परंतु पोलीस या खुनाचा सर्व बाजूने तपास करत आहे.

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर लोकांनी अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून रुग्णालयांच्या बाहेर पोलिस तैनात करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांना शोधण्यासाठी काही टीम तैनात केल्या आहेत. 

सध्या एकीकडे कोरोना व्हायरसने कहर केलेला असल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशावेळी एखाद्या रुग्णालयात घुसून एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्याने चेन्नईत भीतीचं वातावरण आहे. यावरुन तामिळनाडू सरकारवर टीका देखील सुरु झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी