Rakesh Tikait in Bengaluru: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर आज शाईफेक झाली. बंगळुरूत राकेश टिकैत यांची पत्रकार परिषद होती. यावेळी अचानक राकेश टिकैत यांचयावर एका व्यक्तीने शाई फेकली. दरम्यान, ही सरकारची मिलीभगत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांनीवर होती, पण पोलिसांनी त्या व्यक्तीला थांबवलं नसल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे.
बंगुळुरुच्या गांधी भवनमध्ये ही पत्रकार परिषद सुरु होती. शेतकरी नेते राकेश टिकैत आणि युद्धवीर सिंह पत्रकार परिषदेला संबोधित करत होता. एका लोकल चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवर आपली भूमिका स्पष्ट करत होते. यावेळ अचानक एका व्यक्तीने टिकैत यांच्या जवळ येत त्यांच्यावर काळी शाई फेकली. अचानक घडलेल्या या घटनेनं पत्रकार परिषदेत राडा सुरु झाला. लोकांनी एकमेकांनी खुर्च्या फेकण्यास सुरु केली. त्यामुळे एकच गदारोळ सुरु झाला.