INS Vikrant : आत्मनिर्भर भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत

Indigenous INS Vikrant : आयएनएस विक्रांत ही आत्मनिर्भर भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आहे. या अजस्त्र नौकेची लांबी २६२ मीटर आहे. नौकेचे वजन ४५ हजार टन आहे. या नौकेवर ८८ मेगावॅट क्षमतेची विजेची चार गॅस टर्बाइन आहेत. ही नौका जास्तीत जास्त २८ सागरी मैल (नॉट) या वेगाने प्रवास करू शकते.

ins vikrant india indigenous aircraft carrier features and history of development
INS Vikrant : आत्मनिर्भर भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • INS Vikrant : आत्मनिर्भर भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत
  • अजस्त्र नौकेची लांबी २६२ मीटर, नौकेचे वजन ४५ हजार टन
  • नौका जास्तीत जास्त २८ सागरी मैल (नॉट) या वेगाने प्रवास करू शकते

Indigenous INS Vikrant : आयएनएस विक्रांत ही आत्मनिर्भर भारताची पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आहे. या अजस्त्र नौकेची लांबी २६२ मीटर आहे. नौकेचे वजन ४५ हजार टन आहे. या नौकेवर ८८ मेगावॅट क्षमतेची विजेची चार गॅस टर्बाइन आहेत. ही नौका जास्तीत जास्त २८ सागरी मैल (नॉट) या वेगाने प्रवास करू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार २ सप्टेंबर रोजी आयएनएस विक्रांत ही विमानवाहक नौका भारतीय नौदलाला सुपूर्द केली जाईल. यानंतर भारताचा समावेश सहा देशांच्या एलिट ग्रुपमध्ये होईल. एलिट ग्रुपमधील निवडक देश ४० हजार टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या विमानवाहक नौका तयार करण्यास सक्षम आहेत. 

आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेतील ७६ टक्के भाग हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे. ही अजस्त्र विमानवाहत नौका २० हजार कोटी रुपयांत तयार झाली. संरक्षण मंत्रालय आणि कोचीन शिपयार्ड यांच्यात झालेल्या करारानुसार तीन टप्प्यात आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेची निर्मिती करण्यात आली. 

भारतात तयार करण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर एचएएलने तयार केलेले हलक्या वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि हलक्या वजनाचे लढाऊ विमान तसेच मिग २९ लढाऊ विमानांचा ताफा तसेच कामोव्ह ३१, एमएच-६०आर, बहुपयोगी हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे. यामुळे विमानवाहक नौकेवरून एक सक्षम एअरविंग हाताळणे शक्य आहे. 

विमानवाहक नौकेची आवश्यकता

भारताला १९९९च्या कारगिलच्या लढाईच्या निमित्ताने पहिल्यांदा विमानवाहक नौकेची आवश्यकता जाणवू लागली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कॅबिनेटने नव्या विमानवाहक नौकेच्या निर्मितीला मंजुरी दिली. विमानवाहक नौकेच्या निर्मितीचे काम २००९ मध्ये सुरू झाले. नौकेचे २०१३ मध्ये जलावतरण झाले. या विमानवाहक नौकेच्या निर्मितीत बीईएल, भेल, जीआरएसई, केल्ट्रोन, किर्लोस्कर, एल अँड टी, वार्टसिला इंडिया यांच्यासह १०० पेक्षा जास्त एमएसएमई सहभागी झाल्या. डीआरडीओ आणि सेल यांच्यातील करारानुसार विमानवाहक नौकेसाठी उच्च दर्जाचे स्टील वापरण्यात आले. 

आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर कमीत कमी जागेत टेक ऑफ आणि लँडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (Short Take-Off But Arrested Recovery - STOBAR) या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी