Crime News: हॉलिवूड चित्रपटाची स्टाईल चक्क गाड्या चोरण्यासाठी; एका महिन्यात ४० वाहनांची केली चोरी

लोकल ते ग्लोबल
Updated May 28, 2022 | 14:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delhi Crime । हॉलिवूड चित्रपट 'द फास्ट एंड फ्यूरियस' यातून प्रेरित होऊन दिल्ली-एनसीएरमधून ४० आलिशान वाहने चोरण्यात आली आहेत. मागील एका महिन्यात ही ४० आलिशान वाहने चोरली आहेत.

Inspired by Hollywood movie The Fast & Furious, In one month, 40 vehicles were stolen 
हॉलिवूड चित्रपट पाहून एका महिन्यात ४० वाहनांची केली चोरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हॉलिवूड चित्रपट पाहून एका महिन्यात ४० वाहनांची केली चोरी.
  • 'द फास्ट अँड द फ्युरियस' या हॉलिवूड चित्रपटात चोरीची स्टाइल दाखवण्यात आली आहे.
  • आरोपींनी खुलासा केला आहे की त्यांनी प्रथम सॉफ्टवेअर हॅकिंग डिव्हाइस वापरून कार अनलॉक केली.

Delhi Crime । नवी दिल्ली : हॉलिवूड चित्रपट 'द फास्ट एंड फ्यूरियस' (The Fast & Furious) यातून प्रेरित होऊन दिल्ली-एनसीएरमधून ४० आलिशान वाहने चोरण्यात आली आहेत. मागील एका महिन्यात ही ४० आलिशान वाहने चोरली आहेत. ही वाहने चोरण्यासाठी आरोपी जीपीएस जॅमर, स्कॅनर आणि रिमोट कंट्रोल कार यासह अनेक हायटेक गॅझेट वापरत असे आणि चोरी केल्यानंतर वाहनांची विक्री खूप महाग किमतींमध्ये करायचे. यातील एक आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा असून तो 'रवी उत्तम नगर गँग'चा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा : गोरेगावमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

'द फास्ट अँड द फ्युरियस' या हॉलिवूड चित्रपटात चोरीची स्टाइल

पोलिस उपायुक्त मनोज सी यांनी सांगितले की, आरोपी 'द फास्ट अँड द फ्युरियस' या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित होते आणि त्यांनी स्कॅनरचा वापर करून काही मिनिटांत गाड्या अनलॉक केल्या आणि नंतर कारमधील जीपीएस निष्क्रिय करण्यासाठी जॅमरचा वापर केला. आरोपींच्या ताब्यातून दोन पिस्तुलांसह सेन्सर किट, मॅग्नेट, एलएनटी चाव्या आणि आठ रिमोट कारच्या चाव्या अशी वेगवेगळी डिव्हायसेस पोलिसांनी जप्त केली आहेत.

राजस्थान मेरठमध्ये करायचे विक्री

डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी खुलासा केला आहे की त्यांनी प्रथम सॉफ्टवेअर हॅकिंग डिव्हाइस वापरून कार अनलॉक केली. यानंतर कारचे सॉफ्टवेअर फॉरमॅट केल्यानंतर डिव्हाइसच्या मदतीने नवीन सॉफ्टवेअर टाकले. नंतर नवीन चाव्या तयार झाल्या आणि दोन ते तीन मिनिटांत त्यांनी गाड्या चोरल्या. डीसीपी पुढे म्हणाले की, आरोपींनी कार चोरल्यानंतर सोसायट्या, रुग्णालये आणि इतर ठिकाणी जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नव्हते तिथे पार्क केल्या. त्यानंतर आरोपी चोरीच्या गाड्या राजस्थान आणि मेरठमध्ये महागड्या किमतीत विकायचे.

पोलिसांनी ३ जणांना घेतले ताब्यात

दरम्यान, आरोपींची ओळख पटली असून त्यामध्ये ४२ वर्षीय मनीश राव, ४३ वर्षीय जगदीप शर्मा आणि ४० वर्षीय मोहम्मद यांचा समावेश आहे. राव आणि शर्मा दिल्लीतील उत्तर नगर येथील आहेत, तर मोहम्मद मेरठचा रहिवासी आहे. पोलिसांनी राव आणि शर्मा यांना तेव्हा पकडले जेव्हा ते पश्चिम विहार परिसरात चोरी केलेल्या वाहनांची डील करण्यासाठी आले होते. आरोपींनी पोलिसांना सांगितले की त्यांनी एप्रिलपासून उत्तम नगर, टिळक नगर, सुभाष नगर, पश्चिम विहार, मुनिरका आणि द्वारका येथून ४० कार चोरी केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी