Jasneet Kaur arrested : गँगस्टरशी कनेक्शन, इंस्टाग्रामवर 2 लाख फॉलोअर्स... BMW मध्ये फिरून अशी करायची ब्लॅकमेल

Jasneet Kaur arrested । इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला इंस्टाग्रामवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून व्यावसायिकांना फसत होती.

Instagram influencer Jasneet Kaur arrested for blackmailing a businessman.
Jasneet Kaur arrested : अश्लील फोटो पाठवून आधी समोरच्याचं मन जिंकायची आणि मग...   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरचा पर्दाफाश
  • ब्लॅकमेलच्या आरोपाखाली अटक
  • हनी ट्रॅपचा भिती दाखवून लुटण्याचा प्रयत्न

Jasneet Kaur arrested । पंजाबमधील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या 'ब्लॅकमेलर हसीना' जसनीत कौरचा (Jasneet Kaur ) पर्दाफाश झाला आहे. तिला लुधियाना  पोलिसांनी (Ludhiana Police ) अटक केल आहे. इंस्टाग्रामवर अश्लील  रील टाकून ती उद्योजकांची मनं जिंकायची आणि त्यांच्याशी चॅटिंग करता करता आपले न्यूड फोटो पाठवायची. (Instagram influencer Jasneet Kaur arrested for blackmailing a businessman )

अधिक वाचा : Donald Trump: Porn Star प्रकरणात अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना अटक, ट्रम्प म्हणाले - 'Not Guilty'

इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर जसनीत कौरला राजवीर या नावानेही ओळखले जाते, तिला लुधियाना पोलिसांनी अटक केली आहेअटकेनंतर त्याला 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे. यादरम्यान तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटचीही चौकशी केली जात आहे.

अधिक वाचा : Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...; एलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo;युजर्स हैराण


कोण आहे जसनीत कौर? 

जसनीत कौर ही संगरूरची रहिवासी आहे आणि तिचे वडील आता या जगात नाहीत. पैसे कमवण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर पॉर्न रील्स बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिचे फॉलोअर्स वाढतील अशी आशा होती. मात्र, ही इच्छाही पूर्ण होऊ न शकल्याने तिने ब्लॅकमेलिंगचा मार्ग पत्करला.

अधिक वाचा : Essential Medicines Prices : भारत सरकारचा निर्णय, 651 औषधांच्या किंमतीत केली कपात


कसा झाला पर्दाफाश ?

जसनीत कौरने लुधियानातील व्यापारी गुरबीरला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान त्याने व्यावसायिकाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि याप्रकरणी व्यापारी गुरबीरवर मोहालीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असूनही जसनीतने गुरबीरला गुंडांकडून धमकावले आणि त्यानंतर गुरबीर लुधियानाच्या मॉडेल टाऊन पोलिस स्टेशनच्या पोलिसात पोहोचला जिथे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी