घरात बार ऐवजी लायब्ररी तयार करा, मुलांवर चांगले संस्कार होतील; गोव्याच्या CMनी दिला सल्ला

Goa CM Pramod Sawant : घरात बार ऐवजी लायब्ररी तयार करा. मुलांवर चांगले संस्कार होतील, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. ते गोव्यात रीड इंडिया सेलिब्रेशन २०२२ या कार्यक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते. 

Instead of building a bar build a library at home it will have a good effect on children Goa CM Pramod Sawant advised
घरात बार ऐवजी लायब्ररी तयार करा, मुलांवर चांगले संस्कार होतील; गोव्याच्या CMनी दिला सल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • घरात बार ऐवजी लायब्ररी तयार करा, मुलांवर चांगले संस्कार होतील; गोव्याच्या CMनी दिला सल्ला
  • घरात लायब्ररी सुरू केली आणि पुस्तक या विषयावर चर्चा केली तर मुलांवर चांगले संस्कार होतील
  • ज्यांना घरात बार तयार करणे शक्य आहे त्यांना घरात लायब्ररी तयार करणे सहज शक्य

Goa CM Pramod Sawant : घरात बार ऐवजी लायब्ररी तयार करा. मुलांवर चांगले संस्कार होतील, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. ते गोव्यात रीड इंडिया सेलिब्रेशन २०२२ या कार्यक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यात बोलत होते. । गोवा

प्रत्येक घरात एक छोटे वाचनालय अर्थात लायब्ररी तयार करणे आवश्यक आहे. पुस्तक वाचनातून मुलांपर्यंत चांगले विचार पोहोचतील. मुलांवर चांगले संस्कार होतील; असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

काही जण घरात खासगी छोटेखानी बार तयार करतात. या बारमध्ये वेगवेगळ्या मद्याच्या (दारू) बाटल्यांचा संग्रह असतो. ही मंडळी त्यांच्या खासगी बारचे तसेच बारमधील दारूचे वारंवार कौतुक करतात. अभिमानाने या विषयावर बोलतात. या उलट नागरिकांनी घरात लायब्ररी सुरू केली आणि पुस्तक या विषयावर चर्चा केली तर मुलांवर चांगले संस्कार होतील; असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

ज्यांना घरात बार तयार करणे शक्य आहे त्यांना घरात लायब्ररी तयार करणे सहज शक्य आहे. माझ्या स्वतःच्या घरात एक लायब्ररी तयार केली आहे. या लायब्ररीचे व्यवस्थापन माझी पत्नी बघते. कामाच्या व्यापांमुळे माझे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण पत्नी आजही भरपूर वाचन करते. ती एक शिक्षका आहे. आपल्या कामासाठी ती लायब्ररीतील वेगवेगळी पुस्तके नियमित वाचते, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी