Independence Day 2022: स्वातंत्र्यदिनी देशावर तीन प्रकारचे Attacks होण्याचा इशारा, PoK मध्ये हल्ल्याचा सराव

Intelligence Alerts Issued on Possible Terror Attacks: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशावर दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेली तीन प्रकारचे इंटेलिजन्स अलर्ट देण्यात आले आहे.

Independence Day Alert in Delhi
स्वातंत्र्यदिनी विविध प्रकारच्या संभाव्य धोका  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • सुरक्षा यंत्रणांना स्वातंत्र्यदिनी विविध प्रकारच्या संभाव्य धोक्यांबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळतेय.
  • कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची अत्यंत काळजीपूर्वक चौकशी करा, असं इंटेलिजन्स अलर्टमध्ये सुरक्षा यंत्रणांना सुचना देण्यात आल्या आहेत.
  • कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे.

नवी दिल्ली: Terror Attack Threat On Independence Day: स्वातंत्र्यदिनाला (Independence Day) आता काही दिवस शिल्लक असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशावर दहशतवादी हल्ला  (Terrorist Attack) होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेली तीन प्रकारचे इंटेलिजन्स अलर्ट देण्यात आले आहे. ज्यामुळे याच्या आधारावर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. दरम्यान यावेळी सुरक्षा यंत्रणांना स्वातंत्र्यदिनी विविध प्रकारच्या संभाव्य धोक्यांबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळतेय. यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरापासून ते लाँचिंग पॅड्स आणि दहशतवाद्यांची घुसखोरी ही बाब समोर आली आहे.

खालीलप्रमाणे आहेत तीन प्रकारचे इंटेलिजन्स अलर्ट 

  1. पहिला अलर्ट म्हणजे ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्यातून सर्व नष्ट करण्याचा प्लान आहे. यासाठी दहशतवादी पीओकेमध्ये ड्रोनला कशी पद्धतीनं लक्ष्य करायचं याचा सराव करत आहेत. गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अलर्टमध्ये हे नमूद करण्यात आलं आहे. 
  2. गुप्तचर यंत्रणेनं दुसरा इशारा दिला आहे की, दहशतवादी अत्याधुनिक IEDs वापरून मोठा हल्ला करू शकतात. हे अत्याधुनिक आयईडी मेटल डिटेक्टरला चकवा देऊ शकतात.
  3. गुप्तचर यंत्रणेच्या तिसऱ्या अलर्टमध्ये दहशतवाद्यांचा एक गट PoK मध्ये कोटिल (KOTIL) नावाच्या तर दुसरा गट PoK मधील  डाटोटे (DATOTE) नावाच्या लॉन्चिंग पॅडनं दिल्लीत पोहोचण्याची तयारी करत आहेत. 

अधिक वाचा- शिवसेना कोणाची? वाद सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

आजूबाजूच्या संशयास्पद गोष्टींकडे लक्ष द्या

कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची अत्यंत काळजीपूर्वक चौकशी करा, असं इंटेलिजन्स अलर्टमध्ये सुरक्षा यंत्रणांना सुचना देण्यात आल्या आहेत. बॉम्ब असल्यास, तो निकामी करताना अधिक काळजी घ्या. कारण अत्याधुनिक आयईडी मेटल डिटेक्टरलाही चकवा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेटल डिटेक्टरवर तैनात असलेल्या पोलिसांनीही विशेष काळजी घ्यावी आणि त्यानंतक त्यांची योग्य तपासणी करावी.

सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर

हवाई हल्ल्याची गुप्तचर माहिती मिळाली आहे. त्यानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडवर आहेत. ड्रोन हल्ला होण्याची शक्यता असल्यानं सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षा कर्मचारी हवेत उडणाऱ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवतात. 

ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांकडून हवेत उडणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत पॅरा-ग्लाइडर्स, पॅरा-मोटर, हँग ग्लायडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली ऑपरेटेड एअरक्राफ्ट, हॉट एअर बलून, लहान आकाराच्या बॅटरीवर चालणारे विमान, क्वाडकॉप्टर आणि पॅरा जंपिंगवर 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

हे आहे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर 

गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दहशतवाद्यांच्या रडारवर एक महत्त्वाची सुरक्षा प्रतिष्ठान, लष्कराची फॉरवर्ड पोस्ट आहे. याशिवाय दहशतवादी सैनिकांनाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणांनी हा अलर्ट दिल्ली पोलीस, जीआरपी, स्थानिक पोलीस आणि अनेक राज्यांच्या गुप्तचर विभागांना पाठवला आहे. तेव्हापासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी