Weather update: पुढील ४ दिवस तीव्र उष्णतेची लाट; गरमीने मोडला १२ वर्षांचा विक्रम, IMD कडून अलर्ट जारी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 29, 2022 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Heat Wave in India | सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उष्णता आहे. हवामान खात्याने संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात पुढील ४ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.

Intense heat wave for next 4 days, Summer breaks 12-year record
गरमीने मोडला १२ वर्षांचा विक्रम, IMD कडून अलर्ट जारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उष्णता आहे.
  • हवामान खात्याने संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात पुढील ४ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
  • दिल्लीत गुरुवारी १२ वर्षातील एप्रिलचा सर्वात उष्ण दिवस ४३.५ सेल्सिअस तापमानासह नोंदवला गेला.

Weather Update today । नवी दिल्ली : सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उष्णता आहे. हवामान खात्याने (Indian Meterological Department) संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात (extreme heatwave) पुढील ४ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, शुक्रवारी राजधानी दिल्लीत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज असून कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. (Intense heat wave for next 4 days, Summer breaks 12-year record). 

अधिक वाचा : डायबिटीजच्या रूग्णांसाठी शुगर वाढणे ठरू शकते धोकादायक

IMD ने जारी केला ऑरेंज अलर्ट

IMD ने आधीच शुक्रवारच्या अंदाजासह ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार शुक्रवारी दिल्लीतील किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा दोन अंशांनी जास्त होते. IMD ने सकाळी ८.३० वाजता जारी केलेल्या बुलेटिननुसार, 'पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, जम्मू, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंडचा काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. पश्‍चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशाच्‍या पश्‍चिम भागावर पडण्‍याची शक्यता आहे.

अनेक भागांत असणार उष्ण वारे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजता हवेतील आर्द्रतेची पातळी २८ टक्के होती. IMD च्या मते, जेव्हा मैदानी भागात तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा ४.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेव्हा उष्ण वारे 'लू' म्हणून घोषित केले जातात. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा ६.४ अंश जास्त असते तेव्हा 'तीव्र उष्णतेची लाट' घोषित केली जाते.

अधिक वाचा : शनिचरी आमावस्येला करा हे सोपे ५ उपाय

गरमीने तोडला १२ वर्षांचा विक्रम 

दिल्लीत गुरुवारी १२ वर्षातील एप्रिलचा सर्वात उष्ण दिवस ४३.५ सेल्सिअस तापमानासह नोंदवला गेला. १८एप्रिल २०१० रोजी राजधानीत कमाल तापमान ४३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. 

२ मे नंतर मिळू शकतो दिलासा

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आर.के. जेनामनी यांनी पहिल्याच दिवशी सांगितले होते की, दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतीय मैदानी भागात २५ फेब्रुवारीनंतर कोणताही लक्षणीय पाऊस झालेला नाही आणि पश्चिम विक्षोभामुळे या भागात प्रथम २ मे रोजी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच काहीसा लक्षणीय पाऊस अपेक्षित आहे. .


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी